Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Assembly Election: महायुतीच्या उमेदावाराला जिंकवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दम भरलाय. आपआपसातील मतभेत विसरा आणि महायुतीच्या उमेदवाराला जिंकवा असं आवाहन शिंदेंनी केलंय.
Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची  शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी
CM Eknath ShindeSaam Tv
Published On

अजय दुधाणे, साम प्रतिनिधी

ज्या ठिकाणी आपल्या उमेदवाराला कमी लीड मिळेल, त्याठिकाणी नगरसेवकपदाचं तिकीट मिळणार नाही, अशी तंबी एकनाथ शिंदे यांनी दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बदलापुरात किसन कथोरे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी सभा आणि रॅलीचा धुराळा उडालाय. प्रत्येक पक्षातील ज्येष्ठ नेते आपल्या उमेदवारांसाठी सभा घेताहेत. प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही आरोप-प्रत्यारोपचे फैरी झडताहेत. प्रत्येक पक्षाला आपल्या उमेदवाराला मोठा मताधिक्यानं निवडणून आणणायचे आहे. त्यामुळे ते मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. आज मुख्यमंत्री शिंदे यांनी बदलापुरात महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी नगरसेवकांना सज्जड दम भरलाय.

बदलापुरात आपसात जे काही वाद असतील ते विसरून जा भाऊबंदकीत कुठलाही वाद नको,असं म्हणत वामन म्हात्रे किसन कथोरेंसाठी काम करतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची युती असली तरी बदलापुरात मात्र शिवसेनेचा एक गट अद्यापही प्रचारात उतरलेला नाही.

आपल्या विरोधात काम केलं जात असल्याची तक्रार किसन कथोरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही एकत्रित बसून सगळे वाद सोडवले जातील मात्र एक दिलाने काम करा अशी सूचना आपल्या कार्यकर्त्यांना केली.

इतकच नाही तर ज्या ठिकाणी आपल्या उमेदवाराला कमी लीड मिळेल त्याठिकाणी नगरसेवकपदाचं तिकीट मिळणार नाही अशी तंबीही एकनाथ शिंदे यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी कथोरे यांच्याविरुद्ध प्रचार सुरू केल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं.

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची  शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी
Maharashtra Assembly Election 2024: सावधान! मतदानासंदर्भात दिशाभूल करणारे संदेश पाठवाल तर होईल कडक कारवाई

तुम्ही वामन म्हात्रे यांची कळ काढली असेल तर दुरुस्त करा. तुमच्यातील वाद स्थानिक पातळीवर मिटवा आणि राज्याचा विचार करून महायुतीचा उमेदवार जिंकवा असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांना महायुतीतील घटक पक्षांचा सामना करावा लागत होता. शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी कथोरे यांच्याविरुद्ध जाहीर आघाडी उघडली होती.

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची  शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी
Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराच्या अखरेच्या दिवशी आमदार किसन कथोरे यांच्यासाठी बदलापुरात महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी शिंदे यांनी आमदार किसन कथोरे यांच्यासह वामन म्हात्रे आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची कान उघाडणी केली. आपण महायुतीमध्ये काम करत आहोत. आपापसातील मतभेद मिटवा. शिवसेनेच्या तसेच महायुतीतील सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी सोबत काम करा, अशा सूचना शिंदे यांनी यावेळी केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com