Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Maharashtra Vidhan Sabha Election Updates : रॅली, सभा, घोंगडी बैठका, कोपरा सभा, बाइक रॅली, घरोघरी भेटी, गावभेटींसह राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला होता.
Maharashtra Lok Sabha Election 2024
Maharashtra Lok Sabha Election 2024Saam TV
Published On

Maharashtra Election news : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होत आहे. बुधवारी राज्यभरातील २८८ जागांवर मतदान होत आहे, त्याआधी ४८ तास म्हणजेच, आज संध्याकाळी सहा वाजेपर्यत प्रचार करण्याची उमेदवारांना संधी असेल. महिनाभरापासून राज्यात सर्वच उमेदवारांनी आणि पक्षांनी मैदानात उतरून जोरदार प्रचार केला. रॅली, सभा, घोंगडी बैठका, कोपरा सभा, बाइक रॅली, घरोघरी भेटी, गावभेटींसह राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला होता.

सोमवार, आज संध्याकाळी विधेनसभेच्या प्रचाराची सांगता होईल. त्यानंतर छुप्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. यावर आयोगाची करडी नजर असेल. बुधवारी, २० तारखेला एकाच टप्यात २८८ मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. उमेदवारांसह मतदारांना देखील याच दिवसाची प्रतीक्षा असेल. प्रचाराच्या तोफा शांत होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत. त्याआधी दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका असेल. अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सभांकडे लक्ष असेल.

Maharashtra Lok Sabha Election 2024
Maharashtra Election: अजित पवारांविरोधात प्रतिभा पवार मैदानात; दादांचा सवाल, पवारांचा पलटवार

आयोगाकडून काय सांगण्यात आले -

राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी मतदान संपण्यापूर्वी 48 तास म्हणजेच सोमवारी 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी सहा वाजेपासून सुरू होत आहे. या कालावधीत दृकश्राव्य माध्यमे ( टेलिव्हिजन ,केबल नेटवर्क ,रेडिओ, सोशल मीडिया) यावर शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या तसेच निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास मनाई आहे.राजकीय जाहिराती,कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024
Assembly Election: व्होट जिहाद विरुद्ध मतांचं धर्मयुद्ध; देवेंद्र फडणवीसांनी ऐकवला नोमानींचा ऑडिओ

प्रचाराच्या थोफा थंडावल्यानंतर रात्रीच्या गोपनीय प्रचारावर प्रशासनाचे लक्ष असेल. आज विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे. सोमवार सायंकाळी सहा ते मंगळवारच्या दिवस- रात्रीच्या हालचालींवर प्रशासनाचे, निवडणूक आयोगाचे आणि भरारी पथकांचे लक्ष राहणार आहे. बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहेत. तत्पूर्वी, १८ नोव्हेंबरच्या सायंकाळी सहापासून मतदान होईपर्यंत, प्रत्येक संशयित हालचालींवर भरारी पथकांचे लक्ष असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com