तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील नामपल्ली येथे एका गोडाऊनला लागलेल्या आगीत अपार्टमेंट जळून खाक झालं. या दुर्घटनेत चार दिवसाच्या मुलासह ९ जणांचा होरपळून मृत्यू झालाय. सेंट्रल झोनचे डीसीपी व्यंकटेश राव यांनी या दुर्घटनेविषयी माहिती दिलीय. (Latest News)
या आगीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात नागरिकांना घराच्या खिडक्यातून लोकांना बाहेर काढत वाचवण्यात येत आहे. नामपल्लीतील बाजारपेठेतील अपार्टमेंटला आग लागल्याची घटना सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. आग शमवण्यासाठी अग्निशमनदलाचे चार वाहन घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
अग्निशमनदलाचे जवान लोकांना वाचवत आहेत. इमारतीच्या खिडकीत शिडी लावून महिला आणि लहान मुलांना सुरक्षित बाहेर काढत आहेत. आग भडकल्यानंतर इमारतीतील लोकांना बाहेर पडताही आलं नाही. या आगीत एक बाळंही अडकून पडलं होतं, पण त्याला पोलिसांनी सुखरूपरित्या बाहेर काढलं.
आग तळमजल्याला लागली होती. त्यानंतर आगीने रुद्र रुप धारण करत संपूर्ण अपार्टमेंटला आपल्या विळख्यात घेतलं. वरील मजल्यावर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट तयार झाले होते. धुरामुळे श्वास कोंडून ६ जणांचा मृत्यू झाला होता. दुरुस्तीसाठी आलेल्या एका कारला आग लागली होती, त्यानंतर या आगीने भडका घेतला, असल्याची माहिती पोलीस उपायुक्त व्यंकटेश्वर राव यांनी दिली. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी आगीत झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केलाय. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं सर्व उपाययोजना करण्याचं आदेश दिलेत.
आग लागल्याच्या घटनेवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते आणि एमआयएमच्य नेत्यांनी घटनास्थळाचा पाहणी केली. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये वाद-विवाद झाल्याचं पाहायला मिळालं. याविषयीचे ट्विट एएनआयनं पोस्ट केलं आहे. तेलगांणाचे मंत्री के टी रामा राव देखील घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी घटनेची पाहणी केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.