बॅालिवूड अभिनेता टायगर श्रॅाफ आपल्या अॅक्शन सिनेमांसाठी प्रसिद्ध आहे. लहानमुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळेच त्याच्या अॅक्शन सिनेमेचे फॅन्स आहेत. टायगर श्रॅाफ नुकताच रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांच्या कॅाप युनिवर्सचा पाचवा सिनेमा 'सिंघम अगेन'मध्ये झळकला होता. या सिनेमाने बॅाक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'सिंघम अगेन'ने आतापर्यंत २३० कोटींची कमाई केली आहे.
सुपरहिट सिनेमाचा भाग बनल्यानंतर टायगर श्रॅाफचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'बागी ४' (Baaghi 4 )चा पहिला पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या पोस्टरमध्ये टायगर श्रॅाफचा खतरनाक लूक पाहायला मिळत आहे. बागी फ्रेंचायझीच्या रिलीज झालेल्या 'बागी', 'बागी २', 'बागी ३' या सिनेमांनी बॅाक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. 'बागी ४' हा बहुप्रतिक्षित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टायगर श्रॅाफचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा 'बागी ४' चा पहिला पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. टायगर श्रॅाफने स्वतः हा पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये टायगर श्रॅाफ वाइल्डलुक मध्ये दिसत आहे. पोस्टरमध्ये टायगर टायलेट पॅाटवर बसला आहे. त्याच्या एका हातात दारुची बाटली आहे.आणि दुसऱ्या हातात खतरनाक औजार आहे ज्याला रक्त लागला आहे. टायगरने तोंडात सिगारेट पकडली आहे. त्याचा शर्ट रक्ताने माखलेला दिसत आहे.
या पोस्टरला शेअर करत टायगरने कॅप्शन दिले कि 'अ डार्कर स्पीरिट, अ बल्डिअर मिशन, दिस टाइम ही इज नॅाट द सेम'. ( A draker spirit, a bloodier mission, This time he is not the same). टायगरने आतापर्यंत केलेल्या सर्व सिनेमांपैकी 'बागी ४'च्या पोस्टरमध्ये, टायगरचा सर्वात हटके आणि खतरनाक लूक पाहायला मिळत आहे. काही वेळातच हा पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या पोस्टरला त्याच्या चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन हर्षा यांनी केले. हर्षा यांनी 'बजरंगी' आणि 'वेदा' सारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. तर साजिद नाडियाडवाला यांनी या सिनेमाला प्रोड्यूस केला आहे. तसेच बागी फ्रेंचायझीच्या सर्व सिनेमांना त्यांनी प्रोड्यूस केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, टायगर श्रॅाफचा अॅक्शन-ड्रामा- थ्रिलर 'बागी ४' ५ सप्टेंबर २०२५ रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. सध्या या सिनेमाचे शुटिंग सुरु असल्याची माहिती मिळत आहे. 'बागी ४ ' च्या पहिल्याच पोस्टरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
Edited by: Priyanka Mundinkeri