पंजाबी अभिनेताआणि गायक दिलजीत दोसांज सध्या आपल्या दिल-लुमिनाटी टूरवर आहे. जगातल्या वेगवेगळ्या देशात तो आपले कॅान्सर्ट करत असतो. भारतातसुद्धा त्याचे कॅान्सर्ट होत असतात. दिलजीत दोसांज नुकताच हैदराबाद मध्ये आपल्या कॅान्सर्टसाठी आला होता. या कॅान्सर्टच्या काही तासांपूर्वी तेलंगणा पोलिसांनी कॅान्सर्टच्या आयोजकांना नोटीस पाठवली होती. ड्रग्स, दारू आणि हिंसाला प्रवृत्त करणारे गाणे न गाण्याचे निर्देश या नोटीशीत देण्यात आले होते.
हैदराबाद कॅान्सर्टनंतर,दिलजीत दोसांजचा कॅान्सर्ट गुजरातमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कान्सर्ट दरम्यान, तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या नोटीशीला दिलजीतने उत्तर दिले आहे. तसेच ड्रग्स, दारू आणि हिंसाला प्रवृत्त करणाऱ्या गाण्यांवर बंदी घातली गेली.त्यामुळे संपूर्ण देशात दारूबंदी करा असा खुला चैलेंज दिलजीतने दिला आहे. दिलजीतने तेलंगणा पोलिसांच्या नोटीशीवर तीव्र नाराजगी दाखवत आपला राग व्यक्त केला आहे.
दिलजीत दोसांजचा दिल-लुमिनाटी टूर सध्या भारतात सुरु आहे. या टूरला त्याच्या चाहत्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला. दिल्ली, हैदराबाद नंतर पुढचा कॅान्सर्ट गुजरातमध्ये आयोजित करण्यात आला होता. हैदराबादमध्ये झालेल्या कॅान्सर्टला तेलंगणा पोलिसांकडून काही अटी लावण्यात आल्या होत्या. या कॅान्सर्टच्या काही तासांपूर्वीच दिलजीत आणि आयोजकांना तेलंगणा सरकारने नोटीस पाठवली होती. या नोटाशीत ड्रग्स, दारू, आणि हिंसाला प्रवृत्त करणारे गाणे न गाण्याचे निर्देश देण्यात आले होते. 'पंज तारा' आणि 'पाटियाला पैग' सारख्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली होती.
गुजरातमध्ये झालेल्या कॅान्सर्टमध्ये दिलजीतने यावर आपला राग व्यक्त केला. 'आज मी दारुशी संबधित कोणतेही गाणे गाणार नाही, कारण गुजरात राज्यात दारुबंदी आहे. यामुळे मी गुजरात सरकारचा फॅन आहे. यासाठी मी गुजरात सरकारला समर्थन देतो. तुम्ही संपूर्ण देशातली दारुची दुकाने बंद करा. मी दारुशी संबधित गाणे गाणं बंद करेन'. असा चैलेंज त्याने दिला. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिलजीतने या सर्व प्रकरणावर आपला राग व्यक्त केला आहे. तो म्हणाला, 'मी कित्येक भजने गायली आहेत. गेल्या दहा दिवसात मी दोन भक्ती गीत रिलीज केले आहे.परंतु याबद्द्ल कोणीही चर्चा करत नाही आहे. सगळे जण फक्त पाटियाला पैग सारख्या गाण्यावरतीच चर्चा करत आहेत. चला, एक मोहिम सुरु करुया, जर सगळ्या राज्यात दारूबंदी घोषित करण्यात आली तर, मी दिलजीत दोसांज दारूशी संबधित कोणतेही गाणे गाणार नाही. तसेच माझ्याकडे एक ऑफर आहे, मी ज्या दिवशी ज्या शहरात परफॅार्म करेन त्या एका दिवशी त्या शहरात दारूबंदी करण्यात यावी. तेव्हा मी दारूशी संबधित गाणे गाणार नाही'.
Edited by: Priyanka Mundinkeri