RR VS DC saam digital
Sports

RR VS DC सामन्यात रिषभ पंत प्रचंड संतापला; रागाच्या भरात असं काय केलं? VIDEO व्हायरल

IPL 2024: आयपीएलचा धुमधडाका सुरू असून, गुरुवारी राजस्थान रॉयल्सनं दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. तत्पूर्वी, दिल्लीचा कर्णधार पंत स्वतःच्या कामगिरीवरच नाखूश दिसला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rishabh Pant Angry

आयपीएलचा धुमधडाका सुरू असून, गुरुवारी राजस्थान रॉयल्सनं दिल्ली(Delhi) कॅपिटल्सचा पराभव केला. तत्पूर्वी, दिल्लीचा कर्णधार पंत स्वतःच्या कामगिरीवरच नाखूश दिसला. संघाला गरज असताना अपेक्षेपेक्षा खराब कामगिरी झाली आणि विकेट गमावून बसला. यामुळं तो स्वतःवरच चिडला आणि पव्हेलियनमध्ये परतताना रागाच्या भरात बॅट भिंतीवर आपटली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IPL 2024 मध्ये गुरुवारी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये सामना झाला. या सामन्यात राजस्थानच्या संघाने संजू सॅमसन याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं. दिल्लीने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रियान परागच्या तुफान खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ५ बाद १८५ धावा केल्या. (Latest Marathi News)

हे आव्हान घेऊन दिल्लीचा संघ मैदानात उतरला. सलामीवीर मिशेल मार्श आणि डेविड वॉर्नरनं डावाची सुरुवात केली. प्लेऑफमध्ये या दोघांनी धमाका केला. ते दोघे मैदानात असेपर्यंत धावा बरसत होत्या. पण दोघेही बाद झाले आणि धावसंख्येला एकप्रकारे ब्रेक लागला. त्यानंतर आलेल्या ट्रिस्टान स्टब्स याने डाव सावरला. डाव सावरतानाच आक्रमक पवित्राही घेतला. त्याने ४४ धावा कुटल्या.

मात्र, राजस्थानचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज बर्गर याच्या माऱ्यापुढे दिल्लीची फलंदाजी फार काळ तग धरू शकली नाही. त्यांना केवळ १७३ धावांपर्यंतच मजल मारता आली.

स्वस्तात बाद झाला, राग बॅटवर काढला

राजस्थानच्या गोलंदाजीचं तगडं आव्हान पेलताना दिल्लीची दमछाक झाली. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर मैदानात कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) आला. त्याने संघाला विजयीपथावर नेण्याचा प्रयत्न केला. पण राजस्थानच्या गोलंदाजांसमोर निभाव लागू शकला नाही. त्याच्या खास शैलीतले फटके खेळल्यानंतर तो बाद झाला. हीच गोष्ट तो पचवू शकला नाही. मैदानाबाहेर जाताना चेहऱ्यावर राग दिसत होता. तो स्वतःवरच चिडला होता. याच रागातून त्यानं केलेलं कृत्य कॅमेऱ्यात टिपलं गेलं. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

२६ चेंडूंत फक्त २८ धावा

रिषभ पंतने २६ चेंडूंत २८ धावा केल्या. यात एक षटकार आणि ४ चौकार होते. कर्णधार म्हणून तो मोठी इनिंग खेळण्यात अपयशी ठरला. चहलनं त्याला बाद केलं. हीच सल त्याच्या मनात राहिली. पव्हेलियनमध्ये जाताना त्याच्या चेहऱ्यावर तो स्वतःवरचाच राग दिसत होता. शेवटी तो राग मैदानाबाहेर गेल्यावर दिसलाच.

पॅव्हेलियनच्या बाजूच्या भिंतीवर त्याने आपल्या हातातली बॅट जोरात आपटली. रिषभ पंतचा हाच संताप कॅमेऱ्यात टिपला गेला. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघून नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. बऱ्याच दिवसांनी मैदानात आला असून, कर्णधार म्हणून तो दबावात आहे की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गेट ओलांडून घरात गेली अन् क्षणातच भिंत कोसळली; महिला थोडक्यात बचावली; VIDEO

IB Recruitment: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी; इंटेलिजेंस ब्युरोमध्ये भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Maharashtra politics : अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंच्या खासदाराला फोन, राजकीय खेळी की फक्त शुभेच्छा?

ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

SCROLL FOR NEXT