सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (SPNI) ने पुढील ७ वर्षांसाठी न्यूझीलंड आधारित सर्व ब्लॅककॅप्स आणि व्हाईट फर्न्स सामने भारतात आणि संबंधित प्रदेशांमध्ये प्रसारित आणि प्रवाहीत करण्यासाठी टेलिव्हिजन आणि डिजिटल हक्क मिळवले आहेत. या करारानुसार, १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०३०-३१ दरम्यान होणाऱ्या भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचा समावेश असेल. ज्यात सर्व द्विपक्षीय कसोटी, एकदिवसीय सामने आणि टी-२० मालिका यांचा समावेश असेल.
हे सर्व सामने सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाच्या क्रीडा चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जातील. यासह सोनी LIV ऍपवर लाईव्ह प्रक्षेपित केले जातील. हे सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाच्या पोर्टफोलियोमध्ये देखील जोडले जाणार आहेत. ज्यात आधीच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB), आणि श्रीलंका क्रिकेट (SLC) यांच्याशी असलेल्या कराराचा समावेश आहे.
एनपी सिंग, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी:
"न्यूझीलंड क्रिकेटसोबतची आमची नवीन भागीदारी जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. न्यूझीलंडचे खेळाडू आपल्या सामर्थ्यासाठी आणि स्पोर्ट्समनशिपसाठी प्रसिद्ध आहेत. न्यूझीलंडचा संघ जागतिक स्तरावरील नामांकित क्रिकेट संघ आहे.”
“हा प्रतिष्ठीत संघ आणि या संघाचे भारतातील चाहते यांच्यातील बंध आणखी दृढ करणे आणि जोपासणे हा आमचा विशेषाधिकार आहे."
डायना पुकेटापू-लिंडन, न्यूझीलंड क्रिकेट अध्यक्ष:
"हा दोन्ही संघटनांसाठी एक रोमांचक काळ आहे.त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांसह, सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया हे भारतातील प्रीमियर स्पोर्ट्स कंटेंट प्रदात्यांपैकी एक आहेत. आम्ही आपल्या सहवासाची वाट पाहत आहोत.”
ब्लॅककॅप्सने गेल्या काही वर्षांत शानदार खेळ करुन दाखवला आहे. २०२१ मध्ये झालेल्या पहिल्याच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपद पटकावलं. पुरुषांच्या संघाने २०२१ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचं उपविजेतेपद पटकावलं. या खेळाडूंच्या शानदार कामगिरीने लाखो मनं जिंकली आहेत.
भारतीय उपखंडातील क्रिकेट चाहत्यांचाही आनंद द्विगुणीत होणार आहे. क्रिकेट चाहते २०३१ च्या शेवटपर्यंत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड,पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघांना ब्लॅककॅप्सविरुद्ध खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
राजेश कौल, सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाचे मुख्य महसूल अधिकारी - वितरण आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि प्रमुख - क्रीडा व्यवसाय:
"भारतीय दर्शकांसाठी मल्टी-स्पोर्ट्स अरेना तयार करणे हा आमचा निरंतर प्रयत्न आहे. यासह आमच्या पोर्टफोलियोमध्ये मार्की प्रॉपर्टीज जोडणे हा देखील आमचा प्रयत्न राहिला आहे. ब्लॅककॅप्सने आपल्या खिलाडूवृत्तीने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत.”
“यामुळे आमच्या न्यूझीलंडसोबतच्या स्पोर्ट्स पोर्टफोलियोमध्ये आणखी भर पडणार आहे. आमच्या या ७ वर्षांच्या करारादरम्यान क्रिकेट फॅन्सपर्यंत उत्तम क्रिकेटिंग अनुभव पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. ज्यात २०२४-२५ मध्ये होणाऱ्या ३ महत्वाच्या द्विपक्षीय मालिकांचा समावेश असणार आहे. ज्यात इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकांचा समावेश असणार आहे. यासह भारतीय संघासोबत २०२६-२७ आणि २०३०-३१ मध्ये होणाऱ्या २ द्विपक्षीय मालिकांचा देखील समावेश असणार आहे." (Cricket news in marathi)
स्कॉट वेनिंक, न्यूझीलंड क्रिकेट (NZC) मुख्य कार्यकारी अधिकारी
"या कराराचा आम्हालाही आनंद झाला आहे. दोन्ही संघटनांची उद्दिष्टे समान आहेत. सोनी स्पोर्ट्स नेटवर्क इंडिया हे आकांक्षी, इन्होवेटिव आणि भविष्यकांक्षी व्यवसाय आहे. आपल्या क्लायंटला प्राधान्य देणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ही मूल्ये NZC खूप मजबूतपणे संबंधित आहेत."
ख्रिस स्मिथ,न्यूझीलंड क्रिकेट, कमर्शियल जनरल मॅनेजर:
"भारत न्यूझीलंड क्रिकेटसाठी एक महत्त्वाची बाजारपेठ होती आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया सोबतची भागीदारी ही जवळून जुळलेल्या हितसंबंधांचा परिणाम होती. हा एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक करार आहे असे म्हणणे योग्य आहे.”
“सोनीची भारतीय बाजारपेठात डिजिटल प्लॅटफॉर्मवर चांगली पकड आहे. त्यामुळे आम्ही दिर्घ आणि परस्पर फायदेशीर भागीदारीसाठी वाट पाहत आहोत. या व्यवस्थांना अंतिम रूप देताना सोनी टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता."
तसेच २०२४-२५ आणि २०२५-२६ हंगामासाठी सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाचे भारतातील डिजिटल हक्कांसाठी अॅमेझॉन प्राईम हे को-एक्सक्लुझिव्ह पार्टनर असणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.