Virender sehwag predicted team india playing 11 prediction for t20 world cup 2024 hardik pandya kl rahul amd2000
Virender sehwag predicted team india playing 11 prediction for t20 world cup 2024 hardik pandya kl rahul amd2000 twitter
क्रीडा | IPL

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी सेहवागने निवडली प्लेइंग ११ ; IPL मधील ५ संघांच्या कर्णधारांना स्थान नाही

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील ३९ सामने खेळले गेले आहेत. ही स्पर्धा झाल्यानंतर १ जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान संघाची घोषणा होण्यापूर्वी भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने संभावित ११ खेळाडूंचा संघ निवडला आहे.

भारतीय संघासाठी डावाची सुरुवात कोण करणार या प्रश्नाने निवडकर्त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी भारतीय संघासमोर रोहितसह, इशान किशन, शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल असे पर्याय आहेत. यापैकी वीरेंद्र सेहवागने यशस्वी जयस्वालची निवड केली आहे. त्याने आपल्या संभाव्य प्लेइंग ११ मध्ये रोहित आणि यशस्वीला स्थान दिलं आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्याने विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिलं आहे.

सलामी जोडीसह यष्टीरक्षण कोण करणार? या प्रश्नानेही निवडकर्त्यांचं डोकेदुखी वाढवली आहे. कारण संघात यष्टीरक्षक म्हणून स्थान मिळवण्यासाठी इशान किशन,संजू सॅमसन, जितेश शर्मा, केएल राहुल आणि रिषभ पंत यांनी दावा केला आहे. दरम्यान सेहवागने रिषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान दिलं आहे.

हार्दिकला ठेवलं बाहेर

मुख्य बाब म्हणजे त्याने हार्दिकला या संघात स्थान दिलेलं नाही. त्याने अष्टपैलू खेळाडू म्हणून शिवम दुबे किंवा रिंकू सिंगपैकी एकाला स्थान दिलं आहे. तर रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादवचा देखील या संघात स्थान दिलं आहे. वेगवान गोलंदाज म्हणून त्याने मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि संदीप शर्माला संघात स्थान दिलं आहे.

अशी आहे सेहवागने निवडलेली प्लेइंग ११...

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, रिंकू सिंग/शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, संदीप शर्मा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT