भारतीय क्रिकेट संघ आणि विराट कोहलीच्या चाहत्यांच्या दबावापुढे अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला नमते घ्यावे लागले आहे. मोहाली येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय मंडळाने ५० टक्के क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी दिली आहे. हा सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना आहे. तत्पूर्वी, बोर्डाने या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी दिली नव्हती, ज्यासाठी कोरोना संसर्ग आणि पंजाब निवडणुकीची (Panjab Assembly Election) मतमोजणी हे कारण सांगण्यात आले. त्याच वेळी, याआधी धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या टी-20 आणि त्यानंतर बंगळुरूमध्ये होणार्या दुसर्या कसोटीसाठी प्रेक्षकांना येण्याची परवानगी होती.
वृत्तसंस्था एएनआयने बोर्डाचे सचिव जय शाह यांच्या हवाल्याने सांगितले की, या प्रकरणात पंजाब क्रिकेट असोसिएशनने प्रेक्षकांना येऊ देण्याचे मान्य केले आहे. शाह म्हणाले, “मोहाली येथील पंजाब क्रिकेट स्टेडियमवर खेळली जाणारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी प्रेक्षकांविना होणार नाही. सध्याच्या परिस्थितीत अनेक बाबींवर अवलंबून असलेल्या प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय राज्य क्रिकेट संघटनेने घेतला आहे. मी पीसीए अधिकार्यांशी बोललो आहे आणि त्यांनी पुष्टी केली आहे की चाहते विराट कोहलीच्या 100व्या कसोटी सामन्यातील ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार होऊ शकतील.''
बीसीसीआयच्या निर्णयावरुन झाला होता गदारोळ
रविवारी 27 फेब्रुवारी रोजी पंजाब क्रिकेट असोसिएशनने मोहाली कसोटीसाठी प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पीसीएने सांगितले होते की, कोरोनाचा धोका लक्षात घेता भारतीय बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही. मात्र, याशिवाय बेंगळुरूमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्टसाठी ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट चाहत्यांनी ट्विटरसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोर्डाच्या या निर्णयावर कडाडून टीका केली आणि बोर्डाला हा निर्णय बदलण्याचे आवाहन केले. आता बोर्डानेही दबावाखाली येऊन निर्णय मागे घेतला आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.