कोहलीचा 100 वा सामना प्रेक्षकांविनाच; IPL बाबत मोठी बातमी!

दुसऱ्या कसोटीत (Test Cricket) जवळपास 15,000 प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतील.
कोहलीचा 100 वा सामना प्रेक्षकांविनाच; IPL बाबत मोठी बातमी!
कोहलीचा 100 वा सामना प्रेक्षकांविनाच; IPL बाबत मोठी बातमी!Saam TV
Published On

भारत आणि श्रीलंका यांच्यात मोहाली येथे ४ मार्चपासून सुरू होणारा पहिला कसोटी सामना प्रेक्षकांना पाहता येणार नाही. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा हा १०० वा कसोटी सामना असणार आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनने (Panjab Cricket Association) स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. त्याचबरोबर बंगळुरूमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटीत ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे. पहिला कसोटी सामना ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान मोहाली येथे आणि दुसरा कसोटी सामना १२ ते १६ मार्च दरम्यान बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुसऱ्या कसोटीत (Test Cricket) जवळपास 15,000 प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतील.

कोहलीचा 100 वा सामना प्रेक्षकांविनाच; IPL बाबत मोठी बातमी!
ICC Test Ranking: भारत नंबर 'दोन'वर, ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्याची संधी

२६ मार्चपासून आयपीएलचा १५ वा हंगाम सुरू होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (MHCA),मुंबई आणि पुणे येथे आयपीएल २०२२ चे आयोजन करणार आहेत. यंदा आयपीएल प्रेक्षकांना पाहता येणार आहे. महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी एमसीएच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आयपीएलसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्याचे मान्य केले आहे. मुंबईत ५५ तर पुण्यात १५ सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे.

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष म्हणाले, धर्मशाला येथेच 2020 मध्ये भारतीय क्रिकेटला कोविडचा धोका सुरू झाला होता. त्यामुळे खेळ तिथेच थांबला होता. यानंतर लखनौ आणि कोलकाता येथील सामनेही कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे रद्द करण्यात आले होते. धर्मशाळामध्ये प्रेक्षकांसह क्रिकेटचे सामने सुरु झाल्याचा आनंद आहे. दोन्ही सामन्यातील प्रेक्षकांचा उत्साह पाहून खूप छान वाटले. मला आशा आहे की इथून कोणीही भारतीय क्रिकेटला रोखू शकणार नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com