ICC Test Ranking: भारत नंबर 'दोन'वर, ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्याची संधी

न्यूझीलंडने हा सामना गमावल्यामुळे क्रमावारीत भारताला फायदा झाला आहे.
ICC Test Ranking
ICC Test RankingSaam TV
Published On

पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला (Team New Zealand) हारवले. त्यामुळे आईसीसी टेस्ट रँकिंगमध्ये न्यूझीलंड आता तिसऱ्या क्रमांकावर गेले आहे. कगिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि मार्को जेनसनच्या (Marco Jenson) चमकदार कामगिरीमुळे शेवटच्या डावात आप्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्याच न्यूझीलंडला १९८ धावांनी हरवले. या विजयासोबत दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबर साधली आहे.

ICC Test Ranking
इंग्लंडविरुद्ध विंडीजला पहिली कसोटी मालिका जिंकून देणाऱ्या गोलंदाजाचं निधन

न्यूझीलंडने हा सामना गमावल्यामुळे क्रमावारीत भारताला फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत (Team India) दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंका मालिकेपुर्वी भारत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे ही मालिका जर भारत जिंकला तर भारतला पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी असणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाही पाकिस्तान सोबत कसोटी मालिका खेळणार आहे.

जागतिक क्रमवारीच्या (World Ranking) अधिकृत वेबसाइटनुसार भारताचे ११६ गुण आहेत तर न्यूझीलंडचे ११५ गुण आहेत. 6 मार्चपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतला श्रीलंकेशी खेळावं लागणार आहे. ऑस्ट्रेलिया ११९ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी पाकिस्तान विरुद्ध मालिका जिंकावी लागेल. न्यूझीलंडची पुढची मालिका इंग्लंडसोबत जूनमध्ये आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com