Michael vaughan on virat kohli retirement saam tv
Sports

Virat Kohli Retiremet: फॉर्म किंवा फिटनेस नव्हे, तर विराट या कारणामुळे घेणार रिटायरमेंट; दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य

Michael Vaughan On Virat Kohli Retirement: इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉनने विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत भाष्य केलं आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या निवृत्तीच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. असं म्हटलं जात आहे की, टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर विराट कोहली टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. या स्पर्धेपूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंचं म्हणणं होतं की, विराट कोहलीने निवृत्ती जाहीर करावी आणि युवा खेळाडूंना खेळण्याची संधी द्यावी. आता इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉनने विराटच्या निवृत्तीबाबत भाष्य केलं आहे.

विराटमध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक

विराटने आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. त्याने फलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही आपली छाप सोडली आहे. मायकल वॉनने त्याच्या या कामगिरीचं जोरदार कौतुक केलं आहे. तो म्हणाला की, 'विराट कोहली केवळ फलंदाजीतच नव्हे, तर क्षेत्ररक्षणातही शानदार कामगरी करतोय. त्याच्यात अजून खुप क्रिकेट शिल्लक आहे.

क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत मायकल वॉनने म्हटले की, ' कोहलीने या हंगामात शानदार कामगिरी केली आहे. तुम्ही कोहलीच्या निवृत्तीबाबत चर्चा करताय, माझ्या मते त्याच्यात आणखी खूप क्रिकेट शिल्लक आहे. तो अजूनही फिट आहे. तो फिटनेसमुळे क्रिकेटमधून निवृत्त होऊच शकत नाही. त्याने ठरवलं तर, कुटुंबाचा विचार करुन क्रिकेटला रामराम करु शकतो. २-३ वर्षांत सर्वकाही बदलून जातं.'

काही दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना विराटने आपल्या निवृत्तीबाबत भाष्य केलं होतं. तो म्हणाला होता की,' खेळाडू म्हणून आमच्या कारकिर्दीची शेवटी तारीख असते. माझ्या संघासाठी खेळताना मला दररोज सर्वोत्तम द्यायचं आहे. मी त्या दिवशी असं करायला हवं होतं, असा विचार करून मला माझी कारकीर्द संपवायची नाही. प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. ज्यादिवशी माझं काम संपेल, मी निघून जाईल. त्यानंतर तुम्ही मला पाहू शकणार नाही. माझ्या कारकिर्दीत काहीतरी करायचं राहुन गेलं याचा मला पश्चात्ताप करायचा नाही. जोपर्यंत मी खेळत आहे तोपर्यंत मी सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असेल. हाच विचार करून मी पुढे जातोय.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lower Cancer Risk Drink: 'ही' तीन पेय महिन्यातून एकदा प्यायलात तर कायमचा ठळेल कॅन्सरचा धोका

Raigad : रायगडमध्ये मुसळधार पाऊस; शाळा कॉलेजला सुट्टी | VIDEO

डिजिटल पत्रकारितेत सकाळची आघाडी कायम; दर्जेदार बातम्यांचा प्रभावी ठसा

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै? वाचा कधीपर्यंत भरता येणार

SCROLL FOR NEXT