virat kohli with dean elgar  yandex
Sports

Virat Kohli- Dean Elgar: 'विराट माझ्यावर थुंकला होता...',दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूचा मोठा खुलासा

Dean Elgar On Virat Kohli: दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज डीन एल्गरने भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

Dean Elgar Statement On Virat Kohli:

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज डिन एल्गरने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊन एक महिनाही उलटलेला नसताना त्याने मोठं वक्तव्य केलं आहे. त्याने २०१५ मध्ये घडलेला विराट कोहलीचा एक किस्सा सांगितला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ २०१५ मध्ये कसोटी ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. यादरम्यान पहिला कसोटी सामना मोहालीत पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत १०८ धावांची खेळी केली होती. डीन एल्गरने असा दावा केला आहे की, विराट त्याच्यावर थुंकला होता. दुसरा थक्क करणारा दावा असा की, एल्गरने विराटला बॅटने मारण्याची धमकी देखील दिली होती.

काय म्हणाला डीन एल्गर?

एका युट्यूब चॅनेलवर बोलताना डीन एल्गर म्हणाला की,'त्यावेळी खेळपट्टीवरुन खिल्ली उडवली जात होती. आर अश्विनविरुद्ध फलंदाजी करत असताना मला लय कायम ठेवायची होती. त्यावेळी रविंद्र जडेजा आणि विराट कोहली माझ्यावर थुंकले होते. त्यानंतर मी त्यांना म्हणालो होतो की, जर तुम्ही असं केलं तर मी तु्म्हाला बॅटने मारेल.' (Cricket news in marathi)

डिन एल्गर जे म्हणाला ते विराटला कळालं होतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना एल्गर म्हणाला की,'हो, मला काय म्हणायचं होतं ते त्याला समजलं होतं. कारण एबी डीव्हीलियर्स आणि तो आयपीएल स्पर्धेत आरसीबीकडून खेळतात.मी त्याला म्हणालो होतो की, जर तू पुन्हा असं काही करशील तर मी तुला याच मैदानावर मारुन खाली पाडेल.आम्ही भारतात असल्याने आम्हाला सतर्क राहावं लागलं.'

कोहलीने मागितली माफी..

भारतीय संघ २०१७-१८ मध्ये ज्यावेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता त्यावेळी विराटने डीन एल्गरला ड्रिक्ंससाठी विचारणा केली होती. विराटला डीन एल्गरची माफी मागायची होती. त्यावेळी हे दोघेही सकाळी ३ पर्यंत ड्रिंक करत होते. हा किस्सा डीन एल्गरने आपल्या मुलाखतीदरम्यान सांगितला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

SCROLL FOR NEXT