BCCI's Big Decision on Kohli and Rohit Post Retirement : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर एकच खळबळ उडाली. विराट कोहलीने निवृत्ती का घेतली? विराट कोहलीने निवृत्ती मागे घ्यायला हवी, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयवर टीका करण्यात आली. पण आता विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत बीसीसीआये मोठा निर्णय घेतला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी त्यांचा ग्रेड A+ करार कायम राहणार आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सायकीया यांनी एएनआयशी बोलताना ही माहिती दिली. दोघेही भारतीय क्रिकेटशी जोडलेले राहणार असून, त्यांना ग्रेड A+ अंतर्गत सर्व सुविधा मिळत राहतील, असे त्यांनी सांगितले.
कोहली आणि शर्मा यांनी भारतीय क्रिकेटला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. कोहलीने आपल्या आक्रमक खेळीने आणि नेतृत्वाने संघाला नव्या उंचीवर नेले, तर रोहितच्या शांत आणि धोरणी नेतृत्वाने टी-२० विश्वचषकासह अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले. त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती, परंतु बीसीसीआयच्या या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांचा राग कमी होऊ शकतो. विराट कोहली आणि रोहित शर्मा यापुढे फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. दोघांनीही टी२० आणि कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
ग्रेड A+ करारांतर्गत खेळाडूंना सर्वोच्च मानधन आणि सुविधा मिळतात. हा करार त्यांच्या योगदानाचा सन्मान ठरतो. बीसीसीआयच्या या पावलामुळे कोहली आणि शर्मा यांचा अनुभव आणि मार्गदर्शन नव्या खेळाडूंना मिळत राहील, अशी चर्चा आहे.
रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा हे चार खेळाडू ग्रेड A+ श्रेणीत आहेत. त्यांना वार्षिक ७ कोटी रुपये मानधन मिळते.
कोणत्या ग्रेडमध्ये कोणते खेळाडू
ग्रेड A (वार्षिक मानधन: ५ कोटी रुपये)
मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत
ग्रेड B (वार्षिक मानधन: ३ कोटी रुपये)
सूर्यकुमार यादव,कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जायस्वाल, श्रेयस अय्यर
ग्रेड C (वार्षिक मानधन: १ कोटी रुपये)
रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई,वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी,ईशान किशन,अभिषेक शर्मा, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती,हर्षित राणा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.