Virat Kohli Retirement: विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटला 'अलविदा'; मुंबईकर खेळाडूची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री

Siddhi Hande

विराट कोहली

रोहित शर्मानंतर किंग विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. आता विराट कोहली फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल.

Virat Kohli Test Retirement

कसोटी कर्णधार

विराट कोहलीला भारताचा सर्वात्तम कसोटी कर्णधार म्हटले जाते. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने कसोटी क्रिकेटवर दशकभर राज्य केले होते.

Virat Kohli Test Retirement

विराटचा स्वभाव

विराट कोहलीने फलंदाजी अन् आपल्या आक्रमक स्वभावाने कसोटी क्रिकेटवर एकहाती वर्चस्व मिळावले होते.

Virat Kohli Test Retirement

विराट कोहलीची कामगिरी

सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर खोऱ्याने धावा जमवल्या आहे.

Virat Kohli Test Retirement

निवृत्तीची घोषणा

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्यामुळे बीसीसीआय आणि भारतीय चाहत्यामध्ये नाराजी आहे.

Virat Kohli Test Retirement

विराटची जागा

विराट कोहलीची चौथ्या क्रमांकाची जागा कोणता खेळाडू घेणार? याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.

श्रेयस अय्यर

विराट कोहली निवृत्त झाल्यामुळे मुंबईकर श्रेयस अय्यर याला पसंती मिळू शकते.

वाइल्ड कार्ड एन्ट्री

गेल्या काही दिवसांपासून कसोटी क्रिकेटपासून दूर असलेल्या श्रेयस अय्यरची टीम इंडियात वाइल्ड कार्ड एन्ट्री होऊ शकते.

बीसीसीआय

श्रेयस अय्यरचा सध्याचा फॉर्म आणि अनुभव पाहाता बीसीसीआयकडून विराट कोहलीच्या जागी अय्यरला संधी देऊ शकते.

१६ कसोटी सामने

श्रेयस अय्यरने आतापर्यंत १६ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

श्रेयसचा पर्फॉर्मन्स

आतापर्यंत श्रेयसला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी हवी तशी मिळाली नाही.पण विराटने निवृत्ती घेतल्यानंतर श्रेयसला टीम इंडियात स्थान मिळू शकते. विराट कोहलीप्रमाणेच श्रेयस अय्यर याची फलंदाजी संयमी आणि आक्रमक आहे, त्यामुळे अय्यरच्या नावाचा विचार केला जाईल.

Next: वडील झाल्यानंतर पुरूषांमध्ये होतात 'हे' ५ बदल, जे कोणालाही दिसत नाही

Fatherhood Changes In Men
येथे क्लिक करा