virat kohli record news virat needs 1 run to complete 1000 runs against csk in ipl history csk vs rcb match twitter
Sports

Virat kohli Record: पहिल्याच सामन्यात विराटला इतिहास रचण्याची संधी! १ धाव करताच मोडणार IPL स्पर्धेतील मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Record News: आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

Ankush Dhavre

CSK vs RCB, IPL 2024 Virat Kohli Record:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिलाच सामना सुपरहिट असणार आहे. या सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे. या सामन्यातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे विराट कोहली. गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला विराट कोहली या सामन्यातून कमबॅक करताना दिसूने येणार आहे. दरम्यान या सामन्यात त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद होणार आहे.

विराट कोहलीच्या नावे या स्पर्धेतील अनेक मोठ मोठ्या रेकॉर्डची नोंद आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात १ धाव करताच त्याच्या नावे मोठा रेकॉर्ड नोंदवला जाणार आहे.

काय आहे खास रेकॉर्ड?

विराट कोहली हा आयपीएलच्या सुरुवातीपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं नेतृत्व करतोय. त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध मोठा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे.टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात विराटने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना ९९९ धावा केल्या आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात केवळ १ धाव करताच तो चेन्नईविरुद्ध खेळताना १००० धावा पूर्ण करण्याची संधी असणार आहे. (Cricket news in marathi)

या आकडेवारी चॅम्पियन्स लीग स्पर्धेचाही समावेश आहे. केवळ आयपीएल स्पर्धेची आकडेवारी पाहिली तर, त्याला चेन्नईविरुद्ध १००० धावा पूर्ण करण्यासाठी केवळ १५ धावांची गरज आहे. त्याने आतापर्यंत चेन्नईविरुद्ध खेळताना ९८५ धावा केल्या आहेत.

हे आहेत चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज...

१) शिखर धवन - १०५७ धावा

२) विराट कोहली-९८५ धावा

३) रोहित शर्मा - ७९१ धावा

४) दिनेश कार्तिक - ६७५ धावा

५ डेव्हिड वॉर्नर - ६४४ धावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आंदोलन

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT