Ravindra Jadeja On Virat Kohli twitter
क्रीडा

Ravindra Jadeja Statement: 'नजर नका लावू..',विराटच्या शतकाबाबत विचारलेल्या प्रश्नावर जडेजा स्पष्टच बोलला

Ravindra Jadeja On Virat Kohli: रविंद्र जडेजाने विराट कोहलीबाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

Ankush Dhavre

Ravindra Jadeja On Virat Kohli:

भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया,इंग्लंड, न्यूझीलंड आणि आता दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघांना धुळ चारत भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेच्या गुणतालितकेत अव्वल १६ गुणांसह अव्वल स्थान गाठलं आहे.

रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर २४३ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात १०१ धावांची तुफानी खेळी करणारा विराट कोहली सामन्याचा हिरो ठरला. दरम्यान या सामन्यानंतर रविंद्र जडेजाने विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

या सामन्यानंतर रविंद्र जडेजाने पत्रकार परिषदेत सहभाग घेतला होता. या पत्रकार परिषदेत त्याला विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या शतकी सेलिब्रेशनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत तो म्हणाला की,' ४९ वं शतक असो ५० वं शतक जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. गोड बातमी अशी की, ही महत्वाची स्पर्धा आहे जी भारतात खेळवली जात आहे. त्यामुळे जे काही रेकॉर्ड बनवले जात आहेत ते आमच्या भल्यासाठीच आहे. त्यामुळे हे असंच सुरु राहु द्या. कोणालाही नजर लावू नका.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' वाढदिवसाचा आणि भारतीय संघाचा काही एक संबंध नाही. आम्ही जेव्हा जेव्हा भारतीय संघाची जर्सी घालून मैदानावर उतरतो तो दिवस आमच्यासाठी वाढदिवसापेक्षा कमी नसतो. खूप कमी लोकांना भारतीय संघाची जर्सी घालण्याची संधी मिळते. जेव्हा तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी चांगला खेळ करता आणि संघाला विजय मिळवून देता यापेक्षा खास काही नसतं.' (Latest sports updates)

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहलीने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली.

तर श्रेयस अय्यरने ७७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ३२६ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ८३ धावांवर संपुष्टात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: 'या' राशीला मिळणार राजयोग,५ राशींवर राहणार देवाची कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : प्रेमाचे रूपांतर विवाहात होईल, तर काहींच्या अंगावर येतील अनेक जबाबदाऱ्या, तुमची रास यात आहे का?

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT