वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीने इतिहास घडवला आहे. ईडन गार्डनच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात बर्थडे बॉय विराट कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतील ४९ वे शतक झळकावले आहे.
यासह त्याने सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक शतके झळकावण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या विक्रमी खेळीनंतर विराटने सचिन तेंडुलकरबाबत बोलताना मन जिंकणारं वक्तव्य केलं आहे.
सामनावीर पुरस्कार पटकावल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, ' आपल्या हिरोच्या विक्रमाची बरोबरी करणं अभिमानास्पद बाब आहे. ते फलंदाज म्हणून परफेक्ट आहेत. हा भावूक करणारा क्षण आहे. मला ते दिवस आठवताय जेव्हा मी त्यांना टीव्हीवर खेळताना पाहायचो. त्यांच्याकडून गौरव होणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.'
तसेच क्रिकेट चाहत्यांबद्दल बोलताना तो म्हणाला की, ' ही एक आव्हानात्मक लढत होती. चाहत्यांनी माझा वाढदिवस आणखी खास बनवला. जेव्हा सलामीवीर फलंदाज चांगली सुरुवात करून देतात त्यावेळी असं वाटतं की, खेळपट्टी फलंदाजी करण्यासाठी उत्तम आहे.'
काय म्हणाला सचिन?
विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर सचिनने एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ' उत्तम खेळी केली विराट... या वर्षी मला ४९ पासून ते ५० पर्यंत पोहचण्यासाठी ३६५ दिवसाचं अवधी लागला. मी अशी आशा करतो की, तू लवकरच ४९ वरून ५० वे शतक पूर्ण करशील आणि माझा रेकॉर्ड मोडशिल. अभिनंदन.. ' (Latest sports updates)
' टीम मॅनेजमेंटकडून मला शेवटपर्यंत फलंदाजी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे मी खुश होतो. जेव्हा आम्ही ३१५ धावांपर्यंत पोहोचलो तेव्हा मला वाटलं होतं की, हा चांगला स्कोअर आहे. मला रेकॉर्ड नाही करायचे मला फक्त धावा करायच्या आहेत. मला क्रिकेट खेळण्याचा आनंद घ्यायचा आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की, मी संघासाठी जे गेली अनेक वर्ष करत होतो ते पुन्हा एकदा करू शकतोय.' असं विराट कोहली म्हणाला. विराट कोहलीने या डावात ११९ चेंडूंचा सामना करत १०० धावांची संयमी खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने १० चौकार मारले. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ५० षटक अखेर ३२६ धावांचा डोंगर उभारला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.