Virat Kohli Viral Video twitter
क्रीडा

Virat Kohli Viral Video: 'I Love You विराट..',लाईव्ह कार्यक्रमात अरिजितने हाक मारताच विराटची भन्नाट रिॲक्शन व्हायरल,Video

Ankush Dhavre

Virat Kohli Reaction On Arijit Singh:

वर्ल्डकप स्पर्धेतील हाय व्हॉल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ७ गडी राखून धुव्वा उडवत वर्ल्डकप स्पर्धेतील सलग आठवा विजय मिळवला. या सामन्यानंतर विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

भारत- पाकिस्तान सामन्यापूर्वी बीसीसीआयने खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी अनेक सेलिब्रिटिंनी हजेरी लावली होती. ज्यात अरिजित सिंग, सुनिधी चौहान, शंकर महादेवन आणि सुखविंदर सिंगसारख्या गायकांचा समावेश होता.

या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होऊ शकलं नाही. मात्र सोशल मीडियावर या कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. अरिजित सिंग आणि विराटचा देखील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, स्टेडियममध्ये अरिजित सिंगचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी विराट कोहली सराव करण्यात व्यस्त होता. स्टेजजवळ येताच अरिजितने विराटला हाक देत 'I Love You virat' असं म्हटलं. हे ऐकताच विराटने त्याला हात दाखवला.हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. तसेच नेटकरी देखील या व्हिडिओवर प्रतिक्रीया देताना दिसून येत आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला. (Latest sports updates)

पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. तर मोहम्मद रिजवानने ४९ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८६ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने ५३ धावा चोपल्या. भारतीय संघाने हा सामना ७ गडी राखून जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT