virat kohli canva
क्रीडा

Virat Kohli: विराट ठरला सर्वाधिक टॅक्स भरणारा खेळाडू! सचिन अन् धोनी किती टॅक्स भरतात?

Virat Became the Highest Tax Payer Athlete: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा सर्वाधिक टॅक्स भरणारा खेळाडू ठरला आहे. एमएस धोनी आणि विराट कोहली किती टॅक्स भरतात?

Ankush Dhavre

Virat Kohli: क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. भारतात क्रिकेटला धर्म मानलं जातं. भारतात सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि एमएस धोनी हे सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहेत. यासह सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीतही हे खेळाडू सर्वोच्च स्थानी आहेत.

नुकताच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा सर्वाधिक टॅक्स देण्यामुळे चर्चेत आला आहे. दरम्यान सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी किती टॅक्स देतात माहितेय का?

माध्यमातील वृत्तानुसार, २०२३-२४ मध्ये सर्वाधिक टॅक्स देणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराट कोहलीने यावर्षी ६६ कोटी रुपये टॅक्स भरला आहे. तो खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी आहे. तर सेलिब्रिटीजच्या यादीतही टॉप ५ मध्ये आहे. या यादीत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी दुसऱ्या स्थानी आहे. धोनीने ३५ कोटी रुपये टॅक्स भरला आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यावर्षी २८ कोटी रुपये टॅक्स भरला आहे.

या खेळाडूंचाही समावेश

या यादीत अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने यावर्षी २३ कोटी रुपये टॅक्स भरला आहे. तर स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने यावर्षी १३ कोटी रुपये टॅक्स भरला आहे. यावरुन हे स्पष्टपणे दिसूने येतं की, हे स्टार खेळाडू केवळ मैदानावरच दमदार कामगिरी करत नाहीत, तर देशाच्या विकासातही मोलाची भूमिका बजावतात. या वृत्तात असंही सांगण्यात आलं आहे की, सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटीजच्या यादीत दाक्षिणात्य अभिनेता विजय थालापती अव्वल स्थानी आहे. त्याने यावर्षी ८० कोटी रुपये टॅक्स भरला आहे.

विराट कोहली हा गेल्या काही महिन्यांपासून कसोटी क्रिकेटपासून दुर आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता तो बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत कमबॅक करताना दिसून येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

Narendra Modi News: पुण्यात PM नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी; पोलिसांची अचानक धावाधाव

SCROLL FOR NEXT