Virat Kohli Rajat Patidar x
Sports

RR VS RCB : पाटीदार नावाला कॅप्टन, निर्णय कोहली घेतोय, विराट-रजतमध्ये बिनसलंय का? मैदानात नेमकं काय घडलं?

Virat Kohli Rajat Patidar : राजस्थान विरुद्ध बंगळुरु हा सामना सुरु आहे. या सामन्यात कर्णधार रजत पाटीदारऐवजी विराट कोहलीने मैदानात निर्णय घेतला. विराट आणि रजत यांच्यात वाद झाल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात आहे.

Yash Shirke

RR VS RCB IPL 2025 : सवाई मानसिंग स्टेडियममध्ये आज आयपीएल २०२५ मधील २८ वा सामना सुरु आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यादरम्यान कर्णधार रजत पाटीदार आणि विराट कोहली यांच्यात काहीतरी बिनसल्याचे पाहायला मिळाले.

फलंदाजी करताना राजस्थानचे यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग हे दोन खेळाडू मैदानात होते. पावर प्लेनंतर सातवी ओव्हर टाकण्यासाठी रजत पाटीदारने सुयश शर्माला बोलावले. कर्णधार संजू सॅमसननंतर राजस्थानची आणखी एक विकेट पडावी यासाठी पाटीदारने सुयशला ओव्हर देण्याचा निर्णय घेतला. पण मध्येच विराट कोहली आला आणि त्याने लियाम लिव्हिंगस्टोनला गोलंदाजी करायला सांगितले.

रजत पाटीदारने घेतलेल्या निर्णयावर विराट कोहलीने स्वत:चा निर्णय थोपवला असे नेटकरी म्हणत आहेत. याशिवाय स्ट्रेटेजिक टाइम आउट दरम्यान विराट कोहली आरसीबीच्या प्रशिक्षकांशी संवाद साधत असताना पाहायला मिळाले. मागच्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यातही विराटने रजतच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. या सर्व गोष्टींवरुन विराट कोहली हा रजत पाटीदारवर एका प्रकारे दबाव आणत असल्याचे लोक म्हणत आहेत. काहीजण रजत नावाला कॅप्टन आहे, आताही विराट कोहलीकडे कर्णधारपद असल्याचे देखील म्हणत आहेत.

राजस्थान रॉयल्सची प्लेईंग ११ :

यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महिश तिक्षणा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग ११ :

फिलिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा, यश दयाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT