Virat Kohli Instagram saam tv
Sports

Virat Kohli: इंस्टावर कोहलीचं कमबॅक! का डिएक्टिव झालेलं विराटचं अकाऊंट? जाणून घ्या

Virat Kohli Instagram: भारतीय क्रिकेट स्टार विराट कोहली पुन्हा इंस्टाग्रामवर परतलाय. काही दिवसांपूर्वी त्याचं इंस्टाग्राम अकाउंट अचानक डिएक्टिव्हेट झालं होतं.

Surabhi Jayashree Jagdish

गुरुवारी मध्यरात्री सोशल मीडिया उघडताच विराट कोहलीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. रात्रीच्या वेळी विराट कोहलीचं इन्स्टा अकाऊंट दिसत नसल्याने चाहते संभ्रामात पडले होते. क्रिकेटच्या मैदानानंतर विराटने सोशल मीडियावरूलाही रामराम म्हटलं का असा प्रश्न पडला होता. मात्र शुक्रवारी सकाळी कोहलीचं अकाऊंट पुन्हा दिसू लागल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

गुरुवारी रात्री अचानक गायब झालेलं विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट पुन्हा एकदा दिसू लागलंय. कोहलीने त्याचं अकाउंट डिलीट केलं का अशी चाहत्यांना काळजी वाटत होती. इन्स्टाग्रामवर कोहलीचे २७४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर तो स्वतः २८३ अकाउंट्सना फॉलो करतो.

नव्या वर्षाच्या निमित्ताने विराट कोहलीने अनुष्का शर्मासोबत दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सिरीजच्या प्रॅक्टिसबाबतही त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. कोहली नेहमीप्रमाणे इंस्टाग्रामवर पोस्ट करत असल्याने चाहतेही आनंदात असतात. मात्र गुरुवारी त्याचं इंस्टाग्राम अकाउंट दिसत नसल्याने सर्वांनाच धक्का बसला. चाहत्यांनी प्रत्येक प्रयत्न करून ते शोधलं मात्र सापडलं नाही.

का झालं विराटचं अकाऊंट डिएक्टिवेट?

मात्र सकाळी विराट कोहलीचं अकाऊंट पुन्हा दिसू लागतं. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झालीये की, विराट कोहलीने स्वतः त्याचं अकाउंट डीअ‍ॅक्टिव्हेट केलेलं नव्हतं. हे कदाचित टेक्निकल ग्लिचमुळे झालं असावं, असं म्हटलं जातंय.

विराट कोहली सध्या त्याच्या कुटुंबासोब लंडनमध्ये राहतो. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. तो टीम इंडियासाठी फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळतो. या महिन्याच्या सुरुवातीला तो न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सिरीजसाठी भारतात आला होता. सिरीज संपल्यानंतर तो पुन्हा लंडनला परतलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Akola Mayor: अकोल्यात कमळ फुलले! बहुमताचा आकडा नसतानाही भाजपने राखला गड; ठाकरेंचा पराभव

Cholesterol: नारळाच्या दुधामुळे वाढतो हार्ट अटॅकचा धोका? कोलेस्टेरॉलवरही होतो 'हा' परिणाम, जाणून घ्या सत्य

Bigg Boss Marathi 6: 'तुला शिव्यांची सवय आहे, मला नाही...'; प्राजक्ता-अनुश्रीची कॅट फाईट, प्रोमो व्हायरल

Valentine Special : व्हॅलेंटाइन स्पेशल घरच्या घरी बनवा टेस्टी चॉकलेट्स, नोट करा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT