Virat Kohli : Saam tv
Sports

Virat Kohli : एकच नंबर! विराट कोहलीचा खणखणीत षटकार, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही पाहत राहिले, VIDEO

Virat Kolhi six video : टीम इंडियाची दिग्गज तंबूत परतले, त्यावेळी विराट कोहली संकटात धावून आला. विराट कोहलीने संयमाने खेळत टीम इंडियाचा डाव सावरला.

Vishal Gangurde

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर मोठं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडिायाने दक्षिण आफ्रिकेसमोर १७६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाची टॉप ऑर्डरही फ्लॉप झाल्यानंतर विराट कोहलीने डाव सावरला. या सामन्यादरम्यान विराट कोहलीने खणखणती षटकार लगावला. विराटच्या षटकारानंतर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू पाहत पाहिले.

विराट कोहलीने फायनलमध्ये मार्को यानसेनच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार लगावला. विराट कोहलीने लगावलेला षटकार थेट स्टेडिअम बाहेर गेला. टीम इंडियाने २० षटकात ७ गडी गमावून १७६ धावा केल्या.

विराटचा खणखणीत षटकार

विराट कोहलीने यानसेनच्या १९ व्या षटकात चार चेंडूत धिम्या गतीने चेंडू टाकला. त्यानंतर विराटने एक पाऊल पुढे टाकत विराट कोहलीने वाइड लाँग ऑनला ९५ मीटर लांब षटकार मारला.

विराट कोहलीने लगावलेला षटकार थेट स्टेडिअमच्या बाहेर गेला. विराट कोहलीची बॅट या स्पर्धेत शांत होती. मात्र, फायनल सामन्यात विराटने आक्रमक रुप दाखवलं. विराट कोहलीने ५९ चेंडूत ६ चौकार, २ षटकार लगावत ७६ धावा लगावल्या.

कोहली व्यतिरिक्त अक्षरने ३१ चेंडूत एक चौकार आणि ४ षटकाराच्याा मदतीने ४७ धावा कुटल्या. विराट आणि अक्षर पटेलने मिळून ५२ चेंडूत ७२ धावांची खेळी खेळली. तर शिवम दुबेने १६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटाकाराच्या मदतीने २७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने सर्वाधिक केशव महाराज आणि एनरिक या दोघांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. रबाडा आणि यानसेन यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

SCROLL FOR NEXT