Virat Kohli Record News: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या संघर्ष करताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत विराटला हवी तशी कामगिरी करता आली नाही.
आता बॉर्डर- गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. विराट कोहली या मालिकेसाठी कसून सराव करतोय. दरम्यान मालिकेतील पहिल्याच सामन्यात विराटला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये रंगणार आहे. या मालिकेत विराटवर मोठी जबाबदारी असणार आहे. कारण विराट या संघातील सर्वात अनुभवी फलंदाज आहे. रोहित शर्मा पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे विराटला मोठी खेळी करावी लागेल.
विराटला मोठा रेकॉर्ड करण्यासाठी अवघ्या २१ धावा करायच्या आहेत. मालिकेतील पहिल्याच सामन्यात २१ धावांचा आकडा गाठताच तो या मालिकेत २००० धावा करण्याचा पल्ला गाठणार आहे. असा रेकॉर्ड करणारा तो सातवा फलंदाज ठरेल.
या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनच्या नावे या मालिकेत ३२६२ धावा करण्याची नोंद आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींग दुसऱ्या स्थानी आहे. त्याच्या नावे २५५५ धावा करण्याची नोंद आहे. विराटने या मालिकेत फलंदाजी करताना १९७९ धावा केल्या आहेत.
भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने या मालिकेत फलंदाजी करताना २४३४ धावा केल्या आहेत. यासह राहुल द्रविडने २१४३ धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने २०४९ आणि चेतेश्वर पुजाराच्या नावे २०३३ धावा करण्याची नोंद आहे. विराट या रेकॉर्डमध्ये चेतेश्वर पुजारा आणि मायकल क्लार्कला मागे सोडू शकतो.
ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता.
या पराभवानंतर भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याचा मार्ग कठीण झाला आहे. भारतीय संघाला जर आता या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात ४-० ने पराभूत करावं लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.