virat kohli  saam tv
Sports

Virat Kohli Records: पहिल्याच कसोटीत विराट रचणार इतिहास! अवघ्या इतक्या धावा करताच दिग्गज खेळाडूला सोडणार मागे

IND vs WI 1st Test : विराट कोहलीकडे एक मोठा विक्रम आपल्या नावे कारण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Records In Test: भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. मालिकेतील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून डोमिनिकातील विंडसर पार्कच्या मैदानावर रंगणार आहे.

या सामन्यात भारतीय संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहलीकडे एक मोठा विक्रम आपल्या नावे कारण्याची संधी असणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्व होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात १५० धावा करताच विराट कोहलीच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे. मोठ्या विक्रमाच्या बाबतीत तो दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू जॅक कॅलिसलाही मागे सोडणार आहे.

या सामन्यात १५० धावा पूर्ण करताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५,५३५ धावा पूर्ण करेल. जॅक कॅलिसने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २५,५३४ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने आतापर्यंत २५, ३८५ धावा केल्या आहेत.

सचिननंतर दुसराच फलंदाज..

यासह विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५,५०० धावांचा डोंगर सर करणार आहे. असा कारनामा करणारा तो सचिन तेंडुलकरनंतर दुसराच भारतीय फलंदाज ठरणार आहे. तर वर्तमानात असा कीर्तिमान प्रस्थापित करणारा विराट हा पहिलाच फलंदाज ठरणार आहे. विराट कोहलीने आतापर्यंत २५, ३८५ धावा केल्या आहेत.

तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ३४,३५७ धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजवर कोणी मोडू शकला नाही. राहूल द्रविड आणि सौरव गांगुलीसारखे दिग्गज फलंदाज या विक्रमाच्या जवळपासही पोहचू शकले नाही. (Latest sports updates)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

१. सचिन तेंडुलकर (भारत) - ३४३५७ धावा

२. कुमार संगकारा (श्रीलंका) - २८०१६ धावा

३. रिकी पॉंटिंग (ऑस्ट्रेलिया) - २७४८३ धावा

४. महेला जयवर्धने (श्रीलंका) - २५९५७ धावा

५. जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रीका) - २५५३४ धावा

६. विराट कोहली (भारत) - २५३८५ धावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांना दुष्काळातून सुखरुप बाहेर काढू - मुख्यमंत्री फडणवीस

8th Pay Commission : मोठी बातमी! ८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ, तारीख समोर

Fruits For Diabetes: डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी फळे खावीत का? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Lung Health : गूळ आणि तुळस खाल्ल्याने फुफ्फुसे मजबूत होतात? जाणून घ्या सत्य

गोकुळसाठी महायुतीचा ठरला फॉर्म्युला; १ वर्ष भाजपला, शिवसेना-राष्ट्रवादीला किती वर्षे अध्यक्ष मिळणार?

SCROLL FOR NEXT