IND vs WI 1st Test Playing 11: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून प्रारंभ होणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग ११ बाबत मोठा खुलासा केला आहे.
यादरम्यान त्याने यशस्वी जयस्वालच्या पदार्पणाबद्दल आणि शुभमन गिलच्या नव्या बॅटिंग पोझिशनबद्दल वक्तव्य केलं आहे.
रेव स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी यशस्वी जयस्वालला संधी दिली जाणार आहे. तर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसून येणार आहे. तर भारतीय संघ २ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. यावरून हे स्पष्ट झालं आहे की, आर अश्विन आणि रविंद्र जदेजाची जोडी खेळताना दिसून येऊ शकते. हे दोघेही अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामुळे संघात २ अतिरिक्त फलंदाजांची देखील भर पडणार आहे.
यशस्वी जयस्वालचा दमदार रेकॉर्ड..
यशस्वी जयस्वालने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २६ डावांमध्ये त्याने १८४५ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने दुहेरी शतक देखील झळकावले आहे. २६५ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
यादरम्यान त्याने २ शतके आणि ९ अर्धशतके झळकावली आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमधील ३२ सामन्यांमध्ये त्याने १५११ धावा केल्या आहेत.
या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावे ५ शतके आणि ७ अर्ध शतकांची नोंद आहे. इतकेच नव्हे तर आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करताना देखील त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने ५७ टी -२० सामन्यांमध्ये १५७५ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)
वेस्ट इंडिजविरूद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी असु शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि जयदेव उनाडकट.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.