ind vs wi
ind vs wisaam tv

IND vs WI 1st Test: कुठे, केव्हा अन् कधी रंगणार IND vs WI पहिल्या कसोटी सामन्याचा थरार? संपूर्ण माहिती जाणून घ्या एकाच Clickवर

IND vs WI Match Details: जाणून घ्या या सामन्याबद्दल सर्वकाही.
Published on

When And Where To Watch IND vs WI 1st Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभव विसरून भारतीय संघ आता नव्याने सुरुवात करणार आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिज संघासोबत दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे.

दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान जाणून घ्या या सामन्याबद्दल सर्वकाही.

ind vs wi
Team India Playing 11: पहिल्या कसोटीत 'या' 3 खेळाडूंचं नशीब उजळणार! पंत सारखाच आक्रमक खेळाडू करणार पदार्पण

भारतीय संघात महत्वाचे बदल..

या दौऱ्यावर होणाऱ्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. या मालिकेसाठी चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव सारख्या खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे.

तर युवा भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकडला संघात स्थान दिलं गेलं आहे. तर मोहम्मद शमीला देखील या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी जयदेव उनाडकट किंवा मुकेश कुमार सारख्या गोलंदाजाला संघात स्थान दिले जाऊ शकते.

हेड टू हेड रेकॉर्ड..

भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ आतापर्यंत ९८ वेळेस आमने सामने आले आहेत. यापैकी भारतीय संघाने २२ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ३० वेळेस भारतीय संघाने बाजी मारली आहे.

तर ४६ सामने ड्रॉ झाले आहेत. २००२ नंतर भारत वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने सलग ८ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. (Latest sports updates)

ind vs wi
Team India New Jersey: जत्रेतून आणलीये का?, टीम इंडियाची नवी जर्सी पाहून फॅन्स संतापले

कुठे आणि केव्हा रंगणार पहिला कसोटी सामना?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी १२ जुलैपासून सुरु होणार आहे. हा सामना डॉमिनिकातील विंडसर पार्कच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होणार आहे. हा सामना डीडी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर फॅनकोड आणि जिओ सिनेमावर हा सामना लाईव्ह पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com