Team India New Jersey: जत्रेतून आणलीये का?, टीम इंडियाची नवी जर्सी पाहून फॅन्स संतापले

Fans Reaction On Team India New Jersey: हे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे .
team india new jersey
team india new jerseysaam tv
Published On

Twitter Reacts On Team India New Jersey: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना बुधवारपासून (१२ जून) डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ नव्या जर्सीत खेळताना दिसून येणार आहे. (Team India New Jersey)

भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागले आहेत. दरम्यान हे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे . (Fans Reactions On Team India's New Jersey)

team india new jersey
Team India Playing 11: पहिल्या कसोटीत 'या' 3 खेळाडूंचं नशीब उजळणार! पंत सारखाच आक्रमक खेळाडू करणार पदार्पण

क्रिकेट चाहत्यांनी या जर्सीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. यामागचं कारण असं की, या जर्सीवर ड्रीम ११ चा भलामोठा लोगो आहे. काहींचं म्हणणं आहे की, या जर्सीपेक्षा BYJU'S ची जर्सी बरी होती. तर अनेकांचं म्हणणं आहे की, ही कसोटी नव्हे तर वनडेची जर्सी आहे.

ड्रीम ११ सोबत केला आहे करार..

भारतीय संघाची नवीन जर्सी पाहिली तर, खांद्यावर निळ्या रंगाची पट्टी आहे. तर जर्सीच्या समोरच्या बाजूला मोठ्या अक्षरात ड्रीम ११ असं लिहण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने ड्रीम ११ सोबत ३५० कोटींचा करार केला आहे. ही जर्सी पाहून चाहत्यांचा पारा चढला आहे. (Latest sports upadates)

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया..

भारतीय संघाचं नाव कुठंय?

या जर्सीच्या समोरच्या बाजूला भारतीय संघाचं नाव नसल्याचं दिसून आलं आहे. यामागचं कारण असं की, द्विपक्षीय मालिकेदरम्यान देशाचं नाव न टाकता प्रायोजकाचं नाव पुढच्या बाजूला छापलं जातं. तर आयसीसीच्या स्पर्धांमध्ये प्रायोजकाच्या नावाऐवजी देशाचं नाव छापलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com