virat kohli 
क्रीडा

IND vs SA: वर्ल्डकप विजयानंतर विराट कोहली भावुक! सामन्यानंतर पत्नी अन् मुलांना केला व्हिडिओ कॉल; पाहा VIDEO

Ankush Dhavre

भारतीय संघाने १७ वर्षांनंतर आयसीसी टी-२० वर्ल्डकप च्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. सामन्यातील शेवटचा चेंडू पडताच भारतीय संघातील खेळाडू जल्लोष साजरा करताना दिसून आले. खेळाडूंसह राहुल द्रविडचे डोळेही पाणावले. दरम्यान या सामन्यानंतर विराट कोहली आपल्या कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारतीय संघाची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षा संपल्यानंतर भारतीय खेळाडूंना अश्रू अनावर झाले. भारतीय संघातील खेळाडू मैदानात जल्लोष करत होते. तर दुसरीकडे विराट कोहलीने आपल्या घरी व्हिडिओ केला. व्हिडिओ कॉलवर तो आपली पत्नी अनुष्का शर्मासह वामिका आणि अकाय कोहलीसोबत संवाद साधताना दिसून आला. ज्यावेळी तो व्हिडिओ कॉलवर बोलत होता त्यावेळी विराट कोहलीच्या डोळ्यात अश्रू होते. मात्र अश्रू आवरत तो अकायसोबत व्हिडिओ कॉलवर मस्ती करताना दिसून आला.

व्हिडिओ कॉलवर त्याने मुलांना फ्लाइंग किस दिली. काही वेळानंतर त्याने आपल्या कुटुंबाला पुन्हा एकदा फोन केला. ज्यात तो आपलं मेडल दाखवताना दिसून आला. हे भावुक करणारे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आणि याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर,भारतीय संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराटने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली आणि संघाची धावसंख्या १७६ वर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ७ धावा दूर राहिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime : हिंगोलीत फिल्मी स्टाईल थरार; कोट्यवधींच्या खंडणीसाठी वृद्धाचं अपहरण करणाऱ्या 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

VIDEO : PM मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीतून, बघा काय म्हणाले?

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

SCROLL FOR NEXT