virat kohli twitter
क्रीडा

Akash Deep: 9 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला Virat कडून स्पेशल गिफ्ट; PHOTO व्हायरल

Virat Kohli Gift His Bat To Akash Deep: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने भारताच्या युवा गोलंदाजाला बॅट गिफ्ट केली आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Gifted Bat To Akash Deep: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. तो श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. यापूर्वी मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतून विराटने माघार घेतली होती.

आता बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून तो कमबॅक करताना दिसून येणार आहे. दरम्यान विराट आता मैदानातील कामगिरीमुळे नव्हे तर, मैदानाबाहेरील कामगिरीमुळे चर्चेत आला आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात त्याने MRF च्या बॅटचा फोटो शेअर केला आहे. ही बॅट भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट आहे. हा फोटो शेअर करत त्याने 'थँक यू विराट भाई..' असं लिहिलं आहे. विराटने युवा खेळाडूंना बॅट गिफ्ट देण्याची ही पहिलीच वेळ नाही.

यापूर्वीही त्याने अनेक युवा खेळाडूंना बॅट गिफ्ट केली आहे. आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु असताना त्याने रिंकू सिंगला बॅट गिफ्ट केली होती. आता त्याने आकाश दीपला बॅट गिफ्ट केली आहे. ही नवीकोरी बॅट नसून, याच बॅटने त्याने भारतासाठी आतापर्यंत अनेक महत्वाच्या इनिंग खेळल्या आहेत.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत शानदार कामगिरी

आकाश दीपची बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. सध्या तो दुलीप ट्रॉफी स्पर्धा खेळतोय. त्याने शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना गोलंदाजीत शानदार कामगिरी करुन दाखवली आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याने ९ गडी बाद केले होते. त्याची ही शानदार कामगिरी पाहता त्याला बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते.

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT