Virat kohli gets emotional after defeat against rajasthan ryals in rr vs rcb match amd2000 twitter
Sports

Virat Kohli Viral Photo: आरसीबीच्या पराभवानंतर विराट भावुक! सामन्यानंतचा फोटो व्हायरल

RCB vs MI, IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Virat Kohli Viral Photo,IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेत शनिवारी (६ एप्रिल) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना १८३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली ही जोडी मैदानावर आली.

दोघांनी मिळून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी १२५ धावा जोडल्या. फाफ डू प्लेसिस ४४ धावा करत माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ग्लेन मॅक्सवेलला १ आणि सौरव चौहानला केवळ ९ धावा करता आल्या. दरम्यान एका बाजूने विकेट्स जात होत्या. तर दुसरीकडे विराटने एक बाजू धरून ठेवली. त्याने ७२ चेंडूंचा सामना करत ११३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या १८३ धावांपर्यंत पोहचवली. (Cricket news in marathi)

विराटचा फोटो व्हायरल..

विराटच्या शतकी खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटकअखेर १८३ धावा केल्या. ज्या खेळपट्टीवर फलंदाजांचा कस लागत होता. त्याच खेळपट्टीवर १८४ धावा आव्हानात्मक होत्या. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे गोलंदाज या धावांचा बचाव करू शकले नाही. बटलरने बंगळुरूच्या गोलंदाजांना धू धू धुतला आणि ६ गडी राखून सामना जिंकला.

विराटने फलंदाजीत बहुमूल्य योगदान दिलं. मात्र त्याला गोलंदाजीत हवी तशी साथ मिळालेली नाही. यापूर्वी झालेल्या सामन्यांमध्येही गोलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. या सामन्यातील पराभवानंतर विराट कोहलीचा डगआऊटमधील एक फोटो व्हायरल झाला. ज्यात तो भावूक असल्याचं दिसून आलं आहे. या फोटोवर नेटकरीही आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPSC Success Story : बस कंडक्टरची लेक पहिल्याच प्रयत्नात IAS झाली, वाचा डॉ. रेनू राज यांचा प्रेरणादायी प्रवास

Navpancham Rajyog: उद्यापासून चमकणार 'या' राशींचं नशीब; बुध-यम यांच्यामुळे नवपंचम राजयोग तयार होऊन मिळणार पैसा

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

SCROLL FOR NEXT