virat kohli twitter/icc
Sports

Virat Kohli Century: किंग कोहलीने घडवला इतिहास! वाढदिवशीच सचिनच्या शतकांच्या रेकॉर्डशी बरोबरी

Virat Kohli Equals Sachin Tendulkar Record: : विराट कोहलीने वाढदिवशीच सचिनच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Equals Sachin Tendulkar Record:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३७ वा सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात बड्डे बॉय विराटने इतिहास घडवला आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सचिनच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

विराटने या सामन्यात त्याने ११९ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार मारले. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील ४९ वे शतक ठरले आहे. यासह त्याने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याच्या बाबतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. सचिनने आपल्या वनडे कारकिर्दीत ४९ शतकं झळकावली होती.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने ४६३ सामन्यांमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. तर विराट कोहलीने हा कारनामा २८९ व्या सामन्यात करून दाखवला आहे.

तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. रोहितने २५९ सामन्यांमध्ये ३१ शतके झळकावली आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग या यादीत चौथ्या स्थानी आहे. रिकी पाँटींगने ३७५ सामन्यांमध्ये ३० शतके झळकावली आहेत.श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू सनाथ जयसू्र्या या यादीत चौथ्या स्थानी आहे.सनाथ जयसू्र्याने ४४५ सामन्यांमध्ये २८ शतके झळकावली आहेत. (Latest sports updates)

वनडेत सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज..

विराट कोहली - ४९ शतके*

सचिन तेंडुलकर- ४९ शतके

रोहित शर्मा - ३१ शतके

रिकी पाँटिंग - ३० शतके

सनाथ जयसूर्या - २८ शतके

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT