virat kohli
virat kohlisaam tv news

Happy Birthday Virat Kohli: बर्थडे आहे भावाचा... ३५ वर्षीय विराट कोहलीचे हे ३५ रेकॉर्डस् तुम्हाला माहित आहेत का?

Virat Kohli Birthday Special: आज किंग कोहली आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे.
Published on

Happy Birthday Virat Kohli:

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रमुख फलंदाज विराट कोहली आज आपला ३५ वा वाढदिवस साजरा करतोय. विराट केवळ भारतीय संघातील नव्हे तर जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.

आतापर्यंत त्याने एकापेक्षा एक मोठे रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. आपल्या वाढदिवशी तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करण्यासाठी उतरणार आहे. या सामन्यात त्याला सचिनच्या ४९ शतकांची बरोबरी करण्याची संधी असणार आहे. दरम्यान ३५ व्या दिवशी पाहा विराटचे ३५ खास रेकॉर्डस.

१) टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज -४००८ धावा

२) वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज - २०५ डावात

३) सलग ३ वर्षे २५०० पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज - २०१६,२०१७ आणि २०१८ मध्ये.

४) कुठल्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज -१० शतक (श्रीलंका)

५) सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार पटकवणारा खेळाडू - २०

६) एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - ५५८ धावा

७) टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणारा फलंदाज - ३८ अर्धशतक

८) टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार - १५ वेळेस

९) एकही चेंडू न टाकता विकेट घेणारा पहिलाच गोलंदाज

१०) सर्वात कमी डावात ५० शतक झळकावणारा फलंदाज - ३४८ डावात

११) वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतक - २६ शतक

१२) वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वात जलद १ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज - ११ डावात

१३) कसोटीत सर्वात जलद ४ हजार धावा पूर्ण करणारा कर्णधार - ६५ डावात

१४) एका वर्षात वनडेत ६ शतक झळकावणारा पहिलाच कर्णधार

१५) १० हजार धावा असताना ५० च्या सरासरीने धावा करणारा एकमेव फलंदाज (Latest sports updates)

virat kohli
IND vs SA, Playing XI: टीम इंडियात होणार मोठा बदल? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहित या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

१६) कुठल्याही एका संघासाठी सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

१७) आयपीएलच्या ६ हंगामात ६०० पेक्षा अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज

१८) आयपीएल स्पर्धेच्या एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज -९७३ धावा

१९) आयपीएलच्या एकाच हंगामात ४ शतके झळकावणारा एकमेव फलंदाज

२०) सर्वाधिक सामने जिंकणारा भारतीय खेळाडू -३०८ सामने

२१) सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा भारतीय कर्णधार - ४० सामने

२२) कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक दुहेरी शतके झळकावणारा कर्णधार -७ दुहेरी शतक

२३) वनडेत सर्वात जलद १२ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज - २४२ वनडेत

२४) भारतीय संघासाठी सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व करणारा भारतीय कर्णधार -६८ सामने

virat kohli
IND vs SA, Weather Prediction: भारत- दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे धुतला जाणार? वाचा कसं असेल हवामान

२५) वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वोत्कृष्ट सरासरी - ६६

२६) सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज - ७८ शतके

२७) वनडेत सर्वाधिक झेल टिपणारा भारतीय - १५० झेल

२८) भारतीय संघासाठी सर्वाधिक वेळेस मालिकावीर पुरस्कार पटकावणारा खेळाडू - २०

२९) वनडेत सर्वाधिक सरासरी असलेला फलंदाज - ५८

३०) टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू - ७ वेळेस

३१) आयसीसी वनडे रँकिंगमध्ये सर्वाधिक रेटिंग पॉइंट्स गाठणारा खेळाडू - ८९०

३२) आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये सर्वाधिक रेटिंग पॉइंट्स गाठणारा खेळाडू -९२२

३३) दोन देशांविरुद्ध सलग ३ शतक झळलावणारा एकमेव फलंदाज - ( वेस्टइंडीज आणि श्रीलंका )

३४) टी -२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा एकमेव भारतीय फलंदाज

३५) वनडेत सर्वाधिक शतक झळकावणारा दुसरा फलंदाज - ४८ शतक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com