वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत सलग सात सामने जिंकणारा भारतीय संघ आठवा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सुपर संडेचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.
श्रीलंकेला पराभूत करून भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता उर्वरित दोन सामने जिंकून भारतीय संघ आघाडी कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे.
पाहा पिच रिपोर्ट..
ईडन गार्डनची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर ठरते. त्यामुळे या मैदानावर हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळू शकतो. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
या मैदानावर आतापर्यंत ३७ वनडे सामन खेळवले गेले आहेत. यादरम्यान २१ सामने हे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तर १५ सामने हे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या ही २४० इतकी राहिली आहे.
कसं असेल हवामान? (India vs South Africa Pitch Report)
हवामानाबद्दल बोलायचं झालं तर पाऊस पडण्याची कुठलीही शक्यता नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना ५०-५० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो. दिवसाचं तापमान २० डिग्री सेल्सिअस ते ३२ डिग्री सेल्सिअस इतकं असेल. (Latest sports updates)
असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड.. (India vs South Africa Head To Head record)
भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आतापर्यंत ९० वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान ५० सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आहे. तर केवळ ३७ सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. तर ३ सामने अनिर्णित राहिले आहेत. वर्ल्डकप स्पर्धेतील रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही संघ ५ वेळेस आमने सामने आले आहेत. यापैकी ३ सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आहे. तर भारतीय संघाने २ सामने जिंकले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.