Virat Kohli duck retirement debate saam tv
Sports

Virat Kohli: विराट पुन्हा शून्यावर आऊट; एडिलेड वनडेनंतर घेणार निवृत्ती? विकेटनंतर क्राऊडला केलेल्या इशाऱ्यामुळे चर्चांना उधाण

Virat Kohli duck retirement debate: अॅडलेड ओव्हलवर झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाल्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात चाहत्यांना विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होता. मात्र या सामन्यातही विराटला भोपळा फोडता आलेला नाहीये. सलग दुसऱ्या सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला आहे. पहिल्या सामन्यात देखील विराटला एकही रन करता आला नव्हता.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सलग दुसऱ्या सामन्यात विराट कोहली एकही रन न करता पव्हेलियनमध्ये परतला आहे. झेवियर बार्टलेटचा आत येणाऱ्या बॉलवर विराट एलबीडब्ल्यू आऊट झाला. दरम्यान यावेळी विराटने आऊट झाल्यानंतर प्रेक्षकांना एक असा इशारा केला ज्यामुळे त्याच्या वनडे क्रिकेटमधील निवृत्तीबद्दलच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय.

बाद झाल्यानंतर विराटने काय केलं?

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर कोहलीने पॅव्हेलियनमध्ये परतताना अॅडलेड प्रेक्षकांचे आभार मानले. शून्यावर बाद झाल्यानंतरही अॅडलेड प्रेक्षकांनी कोहलीचं कौतुक केलंय. प्रेक्षकांकडून कौतुक होत असताना त्याला प्रतिसाद म्हणून कोहलीने हात वर करून ग्लोव्ह्ज दाखवले. किंग कोहलीची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतेय. तेव्हापासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा अधिकच होऊ लागल्यात.

एडिलेडवर कोहलीचा विक्रम

वनडे क्रिकेटमध्ये एडिलेडवर कोहलीचा रेकॉर्ड चांगला आहे. कोहलीने एडिलेडवर आतापर्यंत ४ वनडे सामने खेळले असून त्याचा सरासरी स्कोअर ६१.०० इतका आहे. यामध्ये दोन शतकांचा समावेश आहेत. विशेष म्हणजे, एडिलेडवर खेळलेल्या सर्व प्रकारांमध्ये (कसोटी, वनडे, टी२०) कोहलीने एकूण ५ शतकं झळकावली आहेत. २०१५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना त्याने शतक ठोकलं होतं. त्यानंतर २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यातही एडिलेडवर त्याने शतकी खेळी केली होती.

रोहित शर्माचा एडिलेडवरील फॉर्म

दुसरीकडे, भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याचा एडिलेडवरील विक्रम फारसा प्रभावी राहिलेला नाही. वनडे क्रिकेटमध्ये रोहितने एडिलेडवर ६ डावांत केवळ १३१ रन्स करता आले आहेत. त्याचा सर्वोत्तम स्कोअर ४३ आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या सिरीजमध्ये पहिल्या सामन्यातही रोहित काही खास करू शकला नाही आणि फक्त ८ रन्स करून बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BSNL चा धमाका! अनलिमिटेड कॉलिंग अन् १०० जीबी डेटा; विद्यार्थांसाठी आणला नवा प्लॅन

Shocking : क्षणात सर्व काही संपलं! सौदी अरेबियातील भीषण अपघात एकाच कुटुंबातील १८ लोकांचा मृत्यू

Income Tax Refund: करदात्यांसाठी बातमी, कर परतावा कधी मिळणार, आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics: चंद्रपुरात भाजपसोबत मोठा गेम,४ नगरपरिषदांमध्ये पक्षात्तर करत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधातच बंडखोरी

Supreme Court :...तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करू; निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT