
सध्या वुमेंस वनडे वर्ल्डकपचा थरार सुरु आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तीन टीम्सने त्यांचं स्थान निश्चित केलं आहे. आता चौथ्या टीमचं स्थान निश्चित होणं बाकी आहे. भारत, न्यूझीलंड आणि श्रीलंका या तीन टीम्समध्ये अटीतटीची स्पर्धा सुरू आहे.
यामध्ये आता भारताचा पुढचा सामना २३ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी होणार आहे. नवी मुंबईच्या मैदानावर रंगणारा हा सामना दोन्ही टीम्ससाठी निर्णायक ठरणार आहे. दुसरीकडे, श्रीलंका आपला शेवटचा लीग सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. अशा परिस्थितीत या तीन टीम्सना उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी कसं समीकरण आहे ते पाहूयात.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला टीम्ससाठी उर्वरित दोन्ही सामने ‘करो या मरो’ प्रकारचे आहेत. भारताने आतापर्यंत ५ सामन्यांतून फक्त ४ पॉईंट्स मिळवले आहेत. यामुळे टीम इंडिया सध्या पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. सेमीफायनलमध्ये फेरीत पोहोचण्यासाठी भारताला न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध दोन्ही सामने जिंकणं अत्यावश्यक आहे.
जर २३ ऑक्टोबरला न्यूझीलंडने भारताला पराभूत केलं तर भारताची स्थिती कठीण होणार आहे. कारण न्यूझीलंडच्या देखील ५ सामन्यांत ४ पॉईंट्स आहेत. अशा वेळी भारताला बांगलादेशविरुद्धचा शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे आणि इंग्लंडने न्यूझीलंडला हरवावं, अशी प्रार्थना करावी लागेल.
न्यूझीलंडची स्थितीही भारतासारखीच आहे. जर भारताने न्यूझीलंडला हरवले, तर न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्धचा शेवटचा सामना जिंकावा लागेल. त्याचबरोबर भारत बांगलादेशविरुद्धचा सामना हरावा, अशी अपेक्षा न्यूझीलंडला करावी लागेल. अशा परिस्थितीत न्यूझीलंड उपांत्य फेरीत पोहोचू शकतो.
श्रीलंका उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी इतर टीम्सवर अवलंबून आहे. श्रीलंकेला ही आशा करावी लागेल की भारत दोन्ही सामने हरावी आणि इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करावं. अशा वेळी श्रीलंका पाकिस्तानला हरवून पुढील फेरीसाठी आपले स्थान निश्चित करू शकते. या तिन्ही टीम्ससाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक सामन्याचा निकाल उपांत्य फेरीतील चौथ्या स्थानाचा निर्णय ठरवणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.