Virat Kohli Dance Video RCB X
Sports

Virat Kohli Dance Video : चेन्नईला त्यांच्याच घरात हरवलं अन् आनंदात विराट कोहलीनं ड्रेसिंग रुममध्ये ठेका धरला, Video व्हायरल

Virat kohli dance viral video : काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना चेपॉकमध्ये खेळला गेला. या सामन्यामध्ये आरसीबीचा विजय झाला. विजयानंतर विराटने ड्रेसिंग रुममध्ये धमाल डान्स केला.

Yash Shirke

RCB VS CSK Match Highlights : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएलमधील महामुकाबला काल चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यामध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्त्वामध्ये बंगळुरूने चेन्नईचा ५० धावांना धुव्वा उडवला. यासोबत १७ वर्षांनी आरसीबीने चेपॉकमध्ये सीएसकेला हरवून इतिहास देखील रचला.

सामना संपल्यानंतर विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये गाण्यांवर थिरकताना दिसला. त्याचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराटसह आरसीबी संघातील अनेक खेळाडू नाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

बंगळुरूकडून कर्णधार रजत पाटीदारने सर्वाधिक ५१ धावा केल्या. फिल सॉल्ट, विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांची पाटीदारला साथ लाभली. पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना २० ओव्हर्समध्ये सात गडी गमावून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १९६ धावा केल्या. चेन्नईच्या गोलंदाजांपैकी नूर अहमदने ३ तर पाथिराणाने २ विकेट्स घेतल्या.

१९७ धावांचे आव्हान असताना चेन्नईचे खेळाडू मैदानामध्ये उतरले. सलामीवीर रचिन रवींद्र टिकून खेळला, दुसऱ्या बाजूला सीएसकेची मध्यम फळी ढेपाळली. त्यातल्या त्यात रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी धावा करण्याचा प्रयत्न केला. बंगळुरूच्या गोलंदाजीसमोर चेन्नईच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही आणि सीएसकेने २० ओव्हर्समध्ये १४६ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT