virat kohli celebrates royal challengers bangalore victory on video call after rcb beat dc capitals in wpl final 2024 watch video  twitter
Sports

WPL 2024,Final: विराटचं स्वप्न स्मृती मंधानाने केलं पूर्ण! ऐतिहासिक विजयानंतर किंग कोहलीचा भन्नाट डान्स; पाहा Video

Virat Kohli Celebration: वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने इतिहास रचला आहे. या स्पर्धेतील फायनलचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला

Ankush Dhavre

RCB vs DC, WPL Final 2024:

वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने इतिहास रचला आहे. या स्पर्धेतील फायनलचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १६ वर्षांचा दुष्काळ संपवत पहिल्यांदाच ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पुरुषांचा संघ गेल्या १६ वर्षांपासून आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र अजूनही एकही ट्रॉफी जिंकता आली नव्हती. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या महिला संघाने वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेची ट्रॉफी जिंकत इतिहासाला गवसणी घातली आहे. या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा ट्रॉफीचा दुष्काळ संपला आहे. यासह आयपीएल स्पर्धेसाठी पुरुष संघाचा आत्मविश्वास देखील वाढवला आहे.

विराट कोहलीचा व्हिडिओ कॉल...

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ट्रॉफी जिंकल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी महिला खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला. तो देखील महिला खेळाडूंच्या आनंदात सहभागी झाला. त्याने विजयानंतर व्हिडिओ कॉल केला. त्याने व्हिडिओ कॉलद्वारे स्मृती मंधाना आणि संघासोबत संवाद साधला. त्याने खेळाडूंचं अभिनंदन केलं. यासह खेळाडूंचं कौतुक देखील केलं. (Cricket news in marathi)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयानंतर संघातील सर्व खेळाडू जल्लोष करत होते. त्यावेळी कर्णधार स्मृती मंधाना विराट कोहलीसोबत संवाद साधताना दिसून आली. विराट देखील प्रचंड आनंदी असल्याचं दिसून आलं. हा केवळ स्मृती मंधाना किंवा विराट कोहलीसाठी नव्हे तर संपूर्ण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रेंचायजीसाठी आनंदाचा क्षण होता.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दिल्ली कॅपिटल्सला या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या दिल्लीचा डाव अवघ्या ११३ धावांवर कोसळला. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सहज पूर्ण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT