Smriti Mandhana : स्मृती मानधनाकडे RCB देणार ही मोठी जबाबदारी! माईक हेसन यांचे संकेत

Smriti Mandhana RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने भारताची धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधानाला मोठी बोली लावून विकत घेतले आहे.
Smriti Mandhana WPL 2023
Smriti Mandhana WPL 2023saam tv

Smriti Mandhana WPL 2023 : महिला प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदाच 5 संघ सहभागी होत असून आज मुंबईत याचा लिलाव सुरु आहे. सर्व संघ लिलावात पैसे खर्च करून स्पर्धेच्या पहिल्या सीझनमध्ये आपली टीम मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने भारतीय संघाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधानाला आपल्या संघात समाविष्ट केले आहे. मृती मधानाला आपल्या संघात घेण्यासाठी आरसीबीने तगडी बोली लावली.

स्मृतीवर खर्च केली 25 टक्क्याहून अधिक रक्कम

डावखुरी स्टायलिश भारतीय सलामीवीर स्मृतीसाठी आरसीबीने 3.4 कोटी रुपये खर्च करून तिचा संघात समावेश केला. यावेळी प्रत्येक संघाला लिलावासाठी 12 कोटी रुपये मिळाले आहेत, यात प्रत्येक संघ किमान 15 आणि जास्तीत जास्त 18 खेळाडू खरेदी करू शकतात. परंतु स्मृतीला संघात आणण्यासाठी आरसीबीने एक चतुर्थांशपेक्षा जास्त म्हणजेच 25 टक्क्यांहून अधिक रक्कम तिच्यावर खर्च केली. (Latest Sports News)

Smriti Mandhana WPL 2023
ICC Player Of The Month Award:कॉन्व्हे अन् सिराजला मागे सोडत गिल ठरला ‘प्लेअर ऑफ द मंथ’पुरस्काराचा मानकरी

स्मृती आरसीबीची कर्णधार बनणार

या लिलावासह स्मृती मंधाना आता जगभरातील महिला क्रिकेट लीगमधील सर्वात महागडी खेळाडू बनली आहे. तिच्या या खरेदीमुळे मंधाना आरसीबी महिला संघाची पहिली कर्णधारही होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संघाचे क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

माईक हेसन यांचे स्पष्ट संकेत

लिलावादरम्यानच्या ब्रेकमध्ये माईक हेसन म्हणाले की, 'स्मृती मानधना आणि पॅरी (एलिस) यांना प्रत्येकजण ओळखतो. आमच्या संघात दोन-तीन खेळाडूंचा समावेश करण्याबाबत आम्हाला खूप विश्वास होता. इतक्या दर्जेदार खेळाडूंना आमच्या संघाचा भाग बनवताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

Smriti Mandhana WPL 2023
WPL Auction 2023 Updates: टीम इंडियातील "जय-विरू"वर कोट्यवधींची बोली, पण कोणत्या संघासोबत दिसणार?

मंधाना, पॅरी आणि डेव्हाईन यांचा संघात समावेश करणे म्हणजे संघ पूर्णत्वास नेण्यासारखे आहे. स्मृतीला कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे आणि तिला भारतीय परिस्थितीची जाणीव आहे, त्यामुळे ती आमची कर्णधार होण्याची दाट शक्यता आहे, असे माईक हेसन म्हणाले. तसेच महिला प्रीमियर लीगची ही पहिलीच आवृत्ती असल्याने त्यांच्याकडे सर्व खेळाडूंचा पुरेसा डेटा नाही. अशा स्थितीत खेळाडू निवडणे हे मोठे आव्हान आहे, असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com