WPL Auction 2023 Updates: टीम इंडियातील "जय-विरू"वर कोट्यवधींची बोली, पण कोणत्या संघासोबत दिसणार?

WPL Auction 2023 News Updates: भारताची धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यावर कोट्यवधींची बोली लागली आहे.
WPL Auction 2023 News Updates
WPL Auction 2023 News UpdatesSAAM YV
Published On

WPL Auction 2023 Updates Smriti Mandhana, Harmanpreet: महिला क्रिकेट लीगसाठी आजचा ऐतिहासिक दिवस आहे. या लीगच्या पहिल्या सत्रासाठी आज मुंबईत खेळाडूंचा लिलाव होत आहे. या लिलावाच्या पहिल्या फेरीत भारताची धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यावर कोट्यवधींची बोली लागली आहे. मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौरला ३.४ कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १.८ कोटी रुपयांमध्ये स्मृती मंधनाला घेतले आहे.

WPL Auction 2023 News Updates
Eoin Morgan Retirement :इंग्लंड संघाला पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या 'कूल' कॅप्टनचा क्रिकेटला रामराम

या लिलावासाठी एकूण 409 महिला खेळाडूंची यादी करण्यात आली असून त्यापैकी 209 भारतीय आणि 163 विदेशी खेळाडू आहेत. अनेक प्रसिद्ध खेळाडूंवर आज कोट्यवधींची बोली लावली जाऊ शकते. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्ज, स्मृती मानधना, ऋचा घोष, हरलीन देओल, शफाली वर्मा यांनी रविवारी पाकिस्तानविरुद्ध सर्वोत्तम अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीयांच्या दृष्टिकोनातून या लिलावाचे खास आकर्षण असेल.

WPL Auction 2023 News Updates
Rupali Chakankar News: रुपाली चाकणकरांना आमदार व्हावंसं वाटतंय! 'या' मतदारसंघातून इच्छुक

कोणती खेळाडू कोणत्या संघात?

- भारताची धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधानाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३.४ कोटी रुपयांना - विकत घेतले.

- दीप्ती शर्माला यूपी वॉरियर्सने २.६ कोटी रुपयांना विकत घेतले.

- भारतीय वेगवान गोलंदाज रेणुका सिंगला बंगळुरूने दीड कोटी रुपयांमध्ये सामील करून घेतले.

- ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीला बेंगळुरूने १.७ कोटी रुपयांना विकत घेतले.

- इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू सोफीला यूपी वॉरियर्सने 1.8 कोटी रुपयांमध्ये सामील केले.

- बंगळुरूने सोफी डिव्हाईनला 50 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले.

- अॅशले गार्डनरला गुजरात जायंट्सने 50 लाख रुपयांना खरेदी केले.

- वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूजला कोणीही खरेदीदार मिळाला नाही.

- नताली शिव्हर मुंबई इंडियन्समध्ये गेली. मुंबई इंडियन्सने नतालीला ३.२ कोटी रुपयांना खरेदी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com