भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो लंडनमध्ये होता. त्याची पत्नी अनुष्का शर्माने लंडनमध्ये एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या मुलाचं नाव त्यांनी अकाय असं ठेवलं आहे. दरम्यान विराट भारतात परतला असून लवकरच तो रॉयल चॅलेजंर्स संघासोबत जोडला जाऊ शकतो.
आयपीएलआधी भारतात परतला..
नुकताच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेसाठी विराट कोहलीलाही भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र मालिका सुरु होण्यापूर्वी त्याने मालिकेतून नाव मागे घेतलं होतं. दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी तो आपल्या पत्नीसोबत लंडनला गेला होता. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अनुष्काने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सुरुवातीला त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेत असल्याचा हवाला दिला. त्यानंतर माघार घेण्याचं खरं कारण समोर आलं.
भारतीय संघातून बाहेर असलेला विराट आयपीएल स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार अशी चर्चा होती. मात्र भारतात परतल्याने तो लवकरच तो भारतीय संघासोबत जोडला जाऊ शकतो. यावेळी तो आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्यासाठी पूर्ण जोर लावताना दिसून येऊ शकतो. (Cricket news in marathi)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर गेल्या १६ हंगामात या संघाने ३ वेळेस फायनल गाठली आहे. मात्र एकदाही फायनल जिंकता आलेली नाही. त्यामुळे यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
विराटने आयपीएलच्या गेल्या हंगामात शानदार फलंदाजी केली होती. या हंगामातील १४ सामन्यांमध्ये त्याने ५३.२५ च्या सरासरीने ६३९ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने २ शतकं आणि ६ अर्धशतकं झळकावली होती. नाबाद १०१ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. आता आयपीएल २०२४ स्पर्धेत तो पुन्हा एकदा रेकॉर्ड्सचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.