Virat Kohli Saam TV
Sports

IND Vs AUS Test Match: अहमदाबाद कसोटीत किंग कोहली करणार 'विराट' कारनामा! खास विक्रमात राहुल द्रविड अन् गावसकरांना सोडणार मागे

Virat Kohli Record: दुसऱ्या डावात जेव्हा भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी येईल त्यावेळी विराट कोहलीकडे एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असणर आहे.

Ankush Dhavre

Ahmedabad Test: अहमदाबाद कसोटी सामन्याला प्रारंभ झाला आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय मह्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यात जोर लावताना दिसून येत आहेत.

ऑस्ट्रेलिया संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दुसऱ्या डावात जेव्हा भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी येईल त्यावेळी विराट कोहलीकडे एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असणर आहे. (Latest sports updates)

विराट कोहली अहमदाबाद कसोटीत इतिहास रचण्यापासून केवळ ४२ धावा दूर आहे. अहमदाबाद कसोटीत ४२ धावा करताच तो कसोटी क्रिकेटमध्ये मायदेशात फलंदाजी करताना ४००० धावा पूर्ण करणार आहे.

यापूर्वी सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवागने हा कारनामा केला आहे.

राहुल द्रविड- सुनील गावासकरांना मागे टाकण्याची संधी..

विराट कोहलीने या धावा याच इनिंगमध्ये केला तर तो राहुल द्रविड आणि सुनील गावसकरांचा विक्रम मोडून काढू शकतो. त्याच्याकडे सर्वात जलद ४००० धावा करणारा तिसरा फलंदाज बनण्याची संधी असणार आहे.

सुनील गावसकरांनी हा कारनामा ८७ तर राहूल द्रविडने हा कारनामा ८८ इनिंगमध्ये केला होता. तर विराटने आतापर्यं एकूण ७६ इनिंगमध्ये ३९५८ धावा केल्या आहेत.

सध्या या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. तर चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या मैदानावर सुरु आहे.

हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका आपल्या नावावर करणार आहे. तर ऑस्टेलिया संघाकडे ही मालिका ड्रॉ करण्याची संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Election : २०१७ मध्ये भाजपची सत्ता, पुन्हा तोच कित्ता गिरवणार का? वाचा काँग्रेसच्या बालेकिल्ल्याची बाराखडी

Nashik Politics: शिवसेना ठाकरे गटाला खिंडार; अनेक कार्यकर्त्यांनी सोडली साथ, शिंदे गटात प्रवेश

Crime News: पत्नीनं प्रियकरासोबत रचला कट; एक लाख रुपयांसाठी नवऱ्याला डोळ्यासमोरच संपवलं

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरचा क्लासिक विंटेज लूक तुम्ही पाहिलात का?

Pooja Sawant: 'कलरफुल' पूजा सांवतचा सोज्वळ अंदाज, नवीन फोटो काळजाचा ठोका चुकवतील

SCROLL FOR NEXT