IND vs AUS 4th Test: पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांसोबत सामन्याला उपस्थित राहणार; कॉमेट्री देखील करण्याची शक्यता

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासोबत मोदी कसोटी सामन्याला उपस्थित राहणार आहेत.
Narendra Modi
Narendra ModiSaam Tv
Published On

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामन्याला हजेरी लावणार आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर आजपासून सुरु होत आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासोबत मोदी कसोटी सामन्याला उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास दीड तास स्टेडियममध्ये राहून खेळाडूंना भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान मोदींच्या शेड्युलनुसार ते ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांसोबत 8:30 वाजता स्टेडियममध्ये पोहोचतील. मोदी आणि अल्बानीज यांची भेट हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्रीला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या समारंभाचा एक भाग आहे. (Sports News)

Narendra Modi
RCB-W Vs GG-W: अखेर गुजरातने उघडले खाते! अटीतटीच्या सामन्यात ११ धावांनी विजय; स्मृतीच्या RCB चा सलग तिसरा पराभव...

सामन्याला त्या दिवशी एक लाख प्रेक्षकांची उपस्थिती अपेक्षित आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येंनी प्रेक्षकांची उपस्थिती हा देखील एक विक्रम असेल. भारतात यापूर्वी सर्वाधिक प्रेक्षक ईडन गार्डन्सवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान सामन्यादरम्यान कॉमेंट्री देखील करू शकतात.

Narendra Modi
Satish Kaushik Death: बॉलिवूडवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन

सामन्यासाठी 75 हजार तिकिटांची विक्री झाली आहे. स्टेडियमच्या बाहेरील परिसरात दोन्ही पंतप्रधानांचे फोटो असलेले अनेक होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. साईटस्क्रीनसमोर एक छोटा स्टेज तयार करण्यात आला आहे. जिथे सामना सुरू होण्यापूर्वी एक छोटा कार्यक्रम होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com