virat kohli twitter
क्रीडा

Virat Kohli Birthday Special: किंग कोहलीचा 36 वा वाढदिवस! पाहा त्याचे 10 'विराट' रेकॉर्ड्स

Virat Kohli Records: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करतोय.

Ankush Dhavre

Virat Kohli Record News In Marathi: भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करतोय. गेल्या दीड दशकांपासून तो भारतीय संघातील प्रमुख फलंदाज आहे. भारताने यावर्षी आयसीसी टी -२० वर्ल्डकपची फायनल जिंकली.

या फायनलमध्ये विराटने ७० धावांची शानदार खेळी केली होती. या शानदार खेळीच्या बळावर भारताने २००७ नंतर पहिल्यांदाच जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. दरम्यान आज विराटच्या वाढदिवशी जाणून घ्या त्याचे टॉप १० रेकॉर्ड.

१) वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १३००० धावा करण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावे आहे. विराटने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात हा कारनामा करून दाखवला होता. त्याने २७८ सामन्यांमध्ये हा रेकॉर्ड केला आहे.

२) सर्वाधिक वेळेस प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार पटकावण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावे आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ५३८ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २१ वेळेस हा पुरस्कार पटकावला आहे.

३) वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावे आहे. वनडेचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटने आतापर्यंत ५० शतकं झळकावली आहेत. या रेकॉर्डमध्ये त्याने सचिन तेंडुलकरला मागे सोडलं आहे.

४) टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याच्या बाबतीत विराट कोहली हा बाबर आझमसह संयुक्तरित्या अव्वल स्थानी आहे.

५) टी -२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३५०० धावा

टी -२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३५०० धावा करण्याचा रेकॉर्ड हा विराटच्या नावे आहे. विराटने ९६ व्या इनिंगमध्ये हा कारनामा करून दाखवला आहे.

६) वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावे आहे. विराटने २०११ वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध शतक झळकावलं होतं.

७) वनडेत एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड हा विराटच्या नावे आहे. विराटने श्रीलंकेविरुद्ध फलंदाजी करताना १० शतकं झळकावली आहेत.

८) एका वर्षात सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या रेकॉर्डमध्ये विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराटने २०१८ मध्ये वनडे, कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये मिळून एकूण ११ शतकं झळकावली होती. याबाबतीत भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनने १९९८ मध्ये फलंदाजी करताना ३९ सामन्यांमध्ये १२ शतकं झळकावली होती.

९) कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने कर्णधार म्हणून एकूण २३१ सामने खेळले आहेत. या यादीत तो आठव्या स्थानी आहे.

१०) विराट २०१८ मध्ये सर्वात जलद ४००० धावा करणारा कर्णधार ठरला होता. त्याने ६५ व्या इनिंगमध्ये हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. यापूर्वी हा रेकॉर्ड ब्रायन लारा यांच्या नावावर होता. त्यांनी ७१ व्या इनिंगमध्ये हा कारनामा केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

SCROLL FOR NEXT