ind vs pak twitter
Sports

IND vs PAK Prediction: 'पाकिस्तानविरुद्ध भारत हरणार...', Viral IITian बाबांची मोठी भविष्यवाणी; नेटकरी संतापले

IITian Baba Prediction On India vs Pakistan Match: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या Viral IITian बाबांनी भारत- पाकिस्तान संघाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

Ankush Dhavre

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले गेले आहे. या महाकुंभमेळ्याला आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी हजेरी लावली आहे. या महाकुंभमेळ्यादरम्यान काही बाबा तुफान चर्चेत राहिले.

ज्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यापैकीच एक बाबा म्हणजे IITian बाबा. आयआयटी मुंबईमधून पासआऊट झालेले हे बाबा तुफान चर्चेत राहिले. आता या बाबाने भारत- पाकिस्तान सामन्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

चांगल्या पगाराची नोकरी सोडून IITian बाबाने साधू बनण्याचा निर्णय घेतला होता. महाकुंभ मेळ्यात या बाबाची तुफान चर्चा रंगली. आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत २३ फेब्रुवारीला भारत- पाकिस्तान सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्याबाबत बोलताना, IITian बाबाने अशी काही भविष्यवाणी केली आहे, जी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

भारताचा पराभव होणार..

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा मी जिंकून दिली होती, असं वक्तव्य IITian बाबाने केलं होतं. त्यांनी रोहितला सांगितलं होतं की, कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची. आता बाबाने भारत पाकिस्तान सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या मते पाकिस्तानचा संघ भारतीय संघाला हरवू शकतो. त्यांच्या या भविष्यवाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारताचा संघ तुफान फॉर्ममध्ये

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध झालेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजयाची नोंद केली होती. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. हा सामना भारताने ६ गडी राखून आपल्या नावावर केला. तर पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडकडून पराभूत होऊन आला आहे. त्यामुळे नक्कीच भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident News : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा थरार, चालकाला डुकली लागली अन् नियंत्रण सुटलं; कारने ५ जणांना चिरडलं

PGCIL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी अन् २२ लाखांचं पॅकेज; PGCIL मध्ये भरती सुरु; आजच करा अर्ज

धक्कादायक! साताऱ्यातील महिला डॉक्टरनं आयुष्याचा दोर कापला; हॉटेलमधील खोलीत आढळला मृतदेह

IND W vs NZ W: 'या' 5 कारणांमुळे भारताने मारली सेमीफायनलमध्ये एन्ट्री; आता वर्ल्डकप जिंकणार का टीम इंडिया?

‘रात गई बात गई…’; विवाहबाह्य संबंधांवर 'या' अभिनेत्रीने केलं धक्कादायक विधान, जान्हवी कपूरलाही बसला धक्का

SCROLL FOR NEXT