Shruti Vilas Kadam
बीटरूटमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. हा फेस पॅक लावल्याने त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो आणि चेहरा ताजातवाना दिसतो.
बेसन त्वचेवरील धूळ, तेल आणि घाण काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि फ्रेश राहते.
बीटरूट आणि गुलाबपाण्यामुळे त्वचेवरील डाग आणि पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते.
गुलाबपाणी त्वचेला ओलावा देते. त्यामुळे त्वचा कोरडी न राहता मऊ आणि ताजीतवानी राहते.
या फेस पॅकमधील नैसर्गिक घटक त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करतात, त्यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
एका वाटीत 2 चमचे बेसन, 1 चमचा बीटरूट रस आणि 1 चमचा गुलाबपाणी घ्या. हे सर्व नीट मिसळून पेस्ट तयार करा.
तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15–20 मिनिटे ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून 2 वेळा वापरल्यास चांगला परिणाम दिसतो.