Nauvari Saree Draping: सहावारी साडीची १० मिनिटांत नेसा परफेक्ट नऊवारी, ट्राय करा या लेटेस्ट ट्रेंडी स्टाईल्स

Shruti Vilas Kadam

योग्य साडी निवडा

सहावारी साडीपासून नऊवारी लूक करायचा असेल तर साडीचा कपडा मऊ आणि हलका असावा. मोठा काठ किंवा खूप जाड साडी टाळल्यास ड्रेपिंग अधिक नीट बसते.

Nauvari Saree Draping | Saam Tv

साडीचा एक भाग कंबरेला बांधा

साडी नेसताना सुरुवातीला कंबरेच्या एका बाजूला साडीचा टोक ठेवून गाठ बांधावी. ही गाठ घट्ट असणे महत्त्वाचे असते, कारण त्यावरच पुढील ड्रेपिंग टिकून राहते.

Nauvari Saree Draping | Saam Tv

समोर प्लेट्स (निर्‍या) तयार करा

साडीच्या पुढच्या भागात लहान-लहान प्लेट्स घ्या. या प्लेट्स समसमान असाव्यात, त्यामुळे साडीचा लूक अधिक आकर्षक दिसतो.

Nauvari Saree Draping | Saam Tv

काष्टा तयार करा

प्लेट्स दोन भागांत विभागून मधला भाग दोन्ही पायांमधून मागे घेऊन जा आणि मागच्या बाजूला खोचा. यालाच पारंपरिक नऊवारीतील ‘काष्टा’ म्हणतात.

Nauvari Saree Draping | Saam Tv

पदर खांद्यावर घ्या

उरलेला साडीचा भाग उजव्या बाजूने पुढे ओढून डाव्या खांद्यावर पदर म्हणून घ्यावा. सहावारी साडीत पदर थोडा लहान ठेवला तर लूक नीट दिसतो.

Nauvari Saree Draping | Saam Tv

मागील भाग नीट सेट करा

मागील बाजूचा साडीचा भाग पुन्हा पुढे आणून त्याच्या छोट्या प्लेट्स करून कंबरेला खोचाव्या. त्यामुळे साडी व्यवस्थित बसते.

Nauvari Saree Draping | Saam Tv

फायनल लूक सेट करा

शेवटी पदर, प्लेट्स आणि काष्टा नीट सेट करा. दागिने, नथ किंवा कमरपट्टा वापरल्यास सहावारी साडीमध्येही सुंदर मराठमोळा नौवारी लूक मिळू शकतो.

Nauvari Saree Draping | Saam Tv

Seviyaan Kheer Recipe: गुढीपाडव्याला घरच्या घरी करा स्वादिष्ट आणि पारंपरिक शेवयांची खीर, वाचा सोपी रेसिपी

Seviyan Kheer Recipe | yandex
येथे क्लिक करा