Vinesh Phogat Retirement Saam Tv
Sports

Vinesh Phogat Retirement: 'अलविदा कुस्ती'; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटची मोठी घोषणा

Vinesh Phogat Announced Retirement After Paris Olympics Disqualifition: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र झाल्यानंतर विनेश फोगाटने मोठा निर्णय घेतला आहे. तिने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Rohini Gudaghe

गिरीश कांबळे, साम टीव्ही मुंबई

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विनेश फोगटने व्यावसायिक कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली आहे. निराश झालेल्या विनेश फोगटने आज ८ ऑगस्ट रोजी सकाळी सोशल मीडिया पोस्टद्वारे कुस्तीतून निवृत्ती जाहीर केलीय. विनेशला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं. बुधवारी सकाळी वजन जास्त भरल्यामुळे तिला सुवर्णपदक गमवावं (Paris Olympic) लागलं. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटचं वजन मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त भरल्याचं समोर आलंय.

विनेश फोगाट नक्की काय म्हणाली?

विनेश फोगाटने तिच्या अधिकृत X सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय (Wrestler Vinesh Phogat) की, आई, माझ्याविरुद्धचा सामना कुस्तीने जिंकला, मी हरले. तुझी स्वप्नं आणि माझं धैर्य चकनाचूर झालंय. आता माझ्याकडे आणखी ताकद नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४. मी तुम्हा सर्वांची कायम ऋणी राहीन. मला माफ करा. या पोस्टमुळे आता क्रीडाक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र

२९ वर्षीय कस्तीपटू विनेश फोगाट ही ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी आणि महिलांच्या ५० किलो वजनी गटात किमान रौप्य पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली (Vinesh Phogat News) होती. परंतु नियमापेक्षा तिचे वजन जास्त आढळून आले. तिचे प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन यांनी प्रयत्न केले, तरीही तिला स्पर्धेतून अपात्र घोषित करण्यात आलं होतं.

विनेश खूप धाडसी

अपात्र ठरल्यानंतर आयओएचे अनेक अधिकारी विनेश फोगटला भेटायला गेले (Vinesh Phogat Retirement) होते. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनीही तिची भेट घेतली. महिलांचे राष्ट्रीय प्रशिक्षक वीरेंद्र दहिया आणि मनजीत राणी यांचीही भेट घेतली होती. या भेटीनंतर दहिया म्हणाले की, विनेश खूप धाडसी खेळाडू आहे. त्यावेळी विनेश म्हणाली की, मेडल मिळालं नाही ही खूप दु:खद गोष्ट आहे. परंतु हा एक खेळाचा भाग असल्याची प्रतिक्रिया तिने दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : प्रज्ञा सातवांसह २ आमदार भाजपात प्रवेश करणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Todya Winter Temprature : महाराष्ट्रात थंडी ओसरली! धुळे, निफाड, जेऊरमध्ये तापमान १० अंशावर; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत बिबट्याची दहशत ,एका रात्रीत चार गुरांना केलं ठार

Panchgrahi Yog: जानेवारीमध्ये शनीच्या राशीत बनणार पॉवरफुल पंचग्रही राजयोग; नव्या वर्षात 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹४५०० येणार; तीन महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT