वर्ल्डकप २०२३मध्ये टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव करत विजयाचा चौकार लगावला आहे. सलग चार सामने जिंकत भारताने पॉईंट टेबलमध्ये आपलं दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. मात्र टीम इंडियाच्या कालच्या विजयापेक्षा विराट कोहलीच्या शतकाची जोरदार चर्चा आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराटने विनिंग शॉटवर शतक साजरं केलं. मात्र विराटचं शतक होईल की नाही, अशी परिस्थिती सामन्यात निर्माण झाली होती. कारण टीम इंडियाला जिंकण्यासाठी कमी आणि विराटच्या शतकसाठी जास्त धावांचा गरज होती. अशावेळी अंम्पायर रिचर्ड केटलबरो यांनी सर्वात मोठी भूमिका बजावल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागली आहे. (Latest sports updates)
सामन्याच्या शेवटच्या क्षणी टीम इंडियाला विजयासाठी फक्त दोन धावांची गरज असताना विराट कोहली त्याच्या शतकापासून तीन धावा दूर होता. येथे नसूम अहमदने चेंडू लेग साईडवर फेकला. मात्र अम्पायरने हा चेंडू वाईड दिला नाही.
यावरुन वाईड न दिल्याच्या अंम्पायरच्या निर्णयावर सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र आयसीसीच्या नियमांवरही नजर टाकली, तर विराटच्या शतकाचा आणि पंचांच्या या निर्णयाचा काहीही संबंध नसल्याचे कळून येईल.
मागील वर्षी जारी करण्यात आलेल्या आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, फलंदाज उभा असलेल्या ठिकाणाहून चेंडू गेला आणि फलंदाजाने ती जागा सोडली, तर त्या चेंडूला वाईड द्यायचं की नाही याचा निर्णय पूर्णत: अंपायरवर अवलंबून आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट फलंदाजी करत असतानाही नेमकं तेच झालं.
विराट लेग स्टंपच्या बाहेर उभा होता. पण चेंडू जवळ येत तो ऑफ स्टंपच्या दिशेने गेला, त्यामुळे चेंडू लेग साइडमधून कीपरच्या हातात गेला. विराटने आपली जागा सोडली नसती तर चेंडू त्याच्या पॅडला लागला असता. अशा अंम्पायरवर अवलंबून आहे की वाईड द्यायचं की नाही.
मात्र अम्पायरने तो वाईड दिला असता तरी विराटने आपले शतक पूर्ण केले असते. कारण वाईड मिळाल्यानंतरही भारताला विजयासाठी एक धाव हवी होती आणि विराटने अखेरच्या सामन्यात षटकार मारला होता. म्हणजेच विराटच्या या शतकात अम्पायरने दिलेल्या वाईड बॉलच्या निर्णयाची काहीही भूमिका नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.