IND vs BAN: बांग्लादेशविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियासाठी गुड न्यूज; सामना संपल्यावर नेमकं काय घडलं? वाचा...

India vs Bangladesh: भारतीय संघाचा यंदाच्या विश्वचषकातील हा चौथा विजय ठरला आहे. या विजयासह टीम इंडियाला आणखी एक गुड न्यूज मिळाली असून क्रिडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
ICC ODI World Cup 2023 another good news for Team india after Against Bangladesh match
ICC ODI World Cup 2023 another good news for Team india after Against Bangladesh matchSaam TV
Published On

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh

विराट कोहलीचे दमदार शतक आणि शुभमन गिलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने बांग्लादेशवर ७ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाचा यंदाच्या विश्वचषकातील हा चौथा विजय ठरला आहे. या विजयासह टीम इंडियाला आणखी एक गुड न्यूज मिळाली असून क्रिडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियासमोर विजयासाठी २५७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. सलग चौथ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांग्लादेशची सुरुवात अतिशय दमदार झाली होती. बांग्लादेशच्या सलामी जोडीने ९३ धावा जोडल्या होत्या. (Latest sports updates)

ICC ODI World Cup 2023 another good news for Team india after Against Bangladesh match
World Cup: सामना जिंकूनही रोहित शर्मा चिंतेत; सामन्यानंतर हार्दिकच्या दुखापतीवर दिली मोठी अपडेट

भारतीय संघाला (Team India) ३०० धावांचं टार्गेट मिळणार आणि सामना रोमांचक होणार असं वाटत असताना कुलदीप यादवने ही जोडी फोडली. त्यानंतर रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि जयप्रीत बुमराहने भेदक मारा करत बांग्लादेशला केवळ २५६ धावांवरच रोखलं. धावसंख्येचा पाठलाग करताना मैदानात उतरलेले भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल बांग्लादेशच्या गोलंदाजांवर तुटून पडले.

दोघांनी मिळून पावरप्लेमध्ये (World Cup 2023) बांग्लादेशी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रोहित हा भन्नाट फॉर्ममध्ये होता. त्याने आवडत्या पूल शॉर्टवर दोन षटकार देखील लगावले. मात्र, ४८ धावांवर असताना तो बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने शुभमन गिलच्या साथीने भारताचा डाव पुढे नेला.

गिल अर्धशतकी खेळी करून बाद झाला. श्रेयस अय्यरला या सामन्यातही मोठी खेळी करता आली नाही. तो १७ धावा काढून बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीने ४२ व्या षटकात भारतीय संघाला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने षटकार मारत आपलं ४८ वं शतक पूर्ण केलं.

विजयानंतर टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज

दरम्यान, या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड कपमधील दोन गुणांची कमाई केली. यापूर्वी भारताच्या खात्यामध्ये ६ गुण होते. या विजयानंतर भारतीय संघाचे ८ गुण झाले आहेत. पण गुणतालिकेत भारतासह न्यूझीलंड संघाचे ८ गुण आहेत. त्यांचं नेट रनरेट चांगलं असल्याने ते पहिल्या क्रमांकावर आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचे समान ८ गुण असले तरी भारतासाठी मात्र एक गुड न्यूज आली आहे.

कारण या वर्ल्ड कपमध्ये भारत फक्त असा दुसराच संघ ठरला आहे ज्यांना सलग चौथा सामना जिंकला आला आहे. कारण या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ८ गुण फक्त दोनच संघांना मिळवता आले आहेत. त्यामुळे सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाने आता एक ठोस पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये पोहोण्यासाठी आता फक्त तीन सामने जिंकावे लागणार आहेत.

ICC ODI World Cup 2023 another good news for Team india after Against Bangladesh match
World Cup 2023 : वर्ल्ड कपच्या इतिहासात हिटमॅन रोहित शर्माचा मोठा विक्रम; धोनीचा विक्रमही मोडला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com